राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करणे बाबत.

 


राष्ट्रीय बालिका दिवस 

National GIRL CHILD Day 

24 जानेवारी 2022

'बेटी बचाओ बेटी पढ़ाओ' योजनेअंतर्गत राष्ट्रीय बालिका दिनानिमीत्त उपक्रम राबविणे बाबत . 

💥 राष्ट्रीय बालिका दिवस विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

 उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की , केंद्रपुरस्कृत बेटी बचाओ बेटी पढाओ योजने अंतर्गत दि . २४ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय बालिका दिनानिमीत्त Social Media , Virtual / online mode व्दारे विविध कार्यक्रम आयोजीत करण्याचे संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आले आहे .

 बेटी बचाओ , बेटी पढाओ अभियानात सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सहभाग घेण्या बाबत व जास्तीत जास्त लोकांपर्यंत अभियानाबाबत जनजागृती करण्यात यावी व आझादी का अमृत महोत्सव , लडकीयाँ जहां , खुशीयाँ वहां , बेटी बचाओ , बेटी पढ़ाओ इ . Tagline वापरण्यात यावे व खालील सर्व उपक्रम कोरोना महामारीचे नियम पाळुन Virtual / online mode व्दारे करण्यात यावी . 

१. जिल्हा आरोग्य अधिकारी / जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर PCPNDT Act बाबत कार्यशाळा घेण्यात यावी . 

२. शिक्षण आदिवासी व समाज कल्याण विभागाने मुख्याध्यापक / शिक्षक , ( प्राथमिक शाळा , जिल्हा परिषद / माध्यमिक शाळा / प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा ( शासकिय अनुदानित विना अनुदानित ) यांचे मार्फत सर्व विद्यार्थ्याकडुन बेटी बचाओ , बेटी पढाओ या विषयावर आधारीत online स्पर्धा यामध्ये रांगोळी काढणे , चित्रकला स्पर्धा , वकृत्व स्पर्धा, घोषवाक्य , कविता वाचन इ . स्पर्धा घेण्यात याव्या व पालकांपर्यंत निर्देशित उपक्रमांबाबत ऑनलाईन माहिती पोहचविण्यात यावी व सर्वांचा सहभाग नोंदवावा . 

३. ग्रामविकास विभागाने ग्रामसेवक / प्रशासक यांचे मार्फत ऑनलाईन ग्रामसभा / महिला सभा घेण्यात यावी व त्यात बेटी बचाओ बेटी पढ़ाओ बाबत सर्व ग्रामस्थांपर्यंत उपक्रमांबाबतची माहिती पोहचविण्यात यावी व सहभाग नोंदवावा.

 ४. बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत अंगणवाडी पर्यवेक्षिका / सेविका , मदतनिस तसेच पालक व किशोरवयीन मुले / मुली यांच्या पर्यंत उपक्रमांबाबतची माहिती ऑनलाईन पोहचवून सहभाग नोंदविणे . 

५. महानगरपालिका व नगरपालिका प्रशासनाने आपल्या अधिनस्त शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मार्फत बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियानाच्या उपक्रमांची माहिती सर्व विद्यार्थी व पालकांपर्यंत ऑनलाईन पोहचविण्यात यावी व सर्वांचा सहभाग नोंदवावा . व त्याबाबतचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांना सादर करावा. 

💥 राष्ट्रीय बालिका दिवस निमित्त विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.👈


@ लेक वाचवा लेक शिकवा अभियान ... घोषवाक्ये पाहण्यासाठी ... येथे क्लिक करा.👈👈

@ लेक वाचवा लेक शिकवा अभियान ... कविता वाचण्यासाठी ...येथे क्लिक करा.👈👈

@ मुलगी वाचवा , मुलगी शिकवा ( बेटी बचाओ , बेटी पढाओ ) अभियाना विषयी सविस्तर माहितीसाठी ... येथे क्लिक करा.👈👈

@ मुलगी वाचवा , मुलगी शिकवा ( बेटी बचाओ , बेटी पढाओ ) संदर्भातील Video / mp3 ...

 (1) बेटियाँ तो है लम्हा खुशी का .. (video song ) 👈👈







Post a Comment

0 Comments