छत्रपती शिवाजी महाराज जयंती
१९ फेब्रुवारी
Chatrapati Shivaji Maharaj Jayanti
छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा !!! 🙏🙏🙏
प्रौढ प्रताप पुरंदर . . .
क्षत्रीय कुलावंतस् . . .
सिंहासनाधिश्वर . . . .
महाराजाधिराज . . . .
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!
📲 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
🔸पूर्ण नाव - शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
🔸जन्म - १९ फेब्रुवारी १६३०, शिवनेरी किल्ला, पुणे
🔸मृत्यू - ३ एप्रिल १६८०, रायगड
🔸उत्तराधिकारी - छत्रपती संभाजीराजे भोसले
🔸वडील - शहाजीराजे भोसले
🔸आई - जिजाबाई
🔸राजघराणे - भोसले
🔸राजब्रीदवाक्य - 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
🔸चलन - होन, शिवराई
✴️ छत्रपती शिवाजीराजे भोसले हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.
✴️ महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो.
🔻सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म (१६३०) ते औरंगजेबाचा मृत्यू (१७०७) ह्या ७७ वर्षांच्या काळास इतिहासकार ‘शिवकाल’ असे म्हणतात.
🔻छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात : "छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यू १६८० मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होतच राहिला.
✴️ पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.
✴️ जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले. शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले.
✴️ इ.स. १६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा (सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.
✴️ छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-
🔸संस्कृत :
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"
🔸मराठी :
ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.
✴️ महाराज लहानाचे मोठे शिवनेरीत येथे झाले. शिवनेरी सोबतची माहुली व पुणे येथे देखील त्यांचे बालपण गेले. शहाजी महाराजांनी शिवाजी आणि जिजाबाई यांच्या हाती संपूर्ण महाराष्ट्राच्या जहागिरीची व्यवस्था सोपविली अणि त्यांना पुण्यात पाठविण्यात आले. जहागिरीची व्यवस्थापन स्वत दादाजी कोंडदेव आणि काही विश्वासू सरदार बघायचे. जिजामाता सारखाच शिवाजी महाराजांमध्ये कणखरपणा, देशासाठी असलेले प्रेम आणि कठीण प्रसंगातून बाहेर येण्याचे ध्येय होते. अशा गुणांमुळे शिवाजी तयार झाले. “स्वराज्य म्हणजे स्वताचे राज्य.” महाराजांना वाटू लागले जर आपल्याला आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर त्यासाठी गड किल्ले आपल्या ताब्यात असले पाहिजे. ही जाणीव त्यांना लहानपणापासून होती.
✴️ रायरेश्वर किल्ल्यावर शिवशंभुच्या मंदिरात २६ एप्रिल १६४५ साली फक्त वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. स्वराज्याचे तोरण बांधताच त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी धाडसी तरुणांचा समुह बनवला ज्याला त्यांनी “ मावळा” असे नाव दिले.
✴️ शिवाजी महाराजांचा विवाह १४ मे १६४० मध्ये सईबाई निंबाळकर यांच्यासोबत लाल महाल पुणे येथे संपन्न झाला.
✴️ ६ जून १६७४ ला गागाभट्ट यांनी हिंदू परंपरेनुसार अनेक ज्येष्ठांच्या अणि श्रेष्ठांच्या उपस्थितीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. त्यांनी शिवराई हे चलन शुरू केले. संपूर्ण रायगड त्या दिवशी नवरी सारखा सजवण्यात आला होता. महाराज केवळ शूर आणि युद्ध निपुणच नव्हे तर ते एक उत्तम प्रशासक देखील होते. धर्माच्या नावाखाली त्यांनी काहीही कुणासोबत पक्षपात केला नाही. छत्रपतींचा राज्याभिषेक रायगडावर पार पडला. यावेळी ३२ मन वजनाचे सुवर्ण सिंहासन घडविण्यात आले होते ज्यावर राजे विराजमान झाले.
✴️ शिवाजी महाराजांचा मृत्यू ३ एप्रिल १६८० मध्ये त्यांची तब्येत खालावत गेली आणि रायगडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एक उत्तम शासक, एक उत्तम राजा, मराठा साम्राज्याचे संस्थापक, श्री छत्रपती शिवाजी महाराज कायम प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत. अशा या महान राजाला कोटी कोटी प्रणाम..!
📲 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈
🙏 स्रोत - विकिपीडिया
0 Comments