वि. स. खांडेकर - मराठी साहित्यिक ओळख

 

मराठी साहित्यिकांची ओळख 

वि. स. खांडेकर 

Vi. S. Khandekhar 

विष्णू सखाराम खांडेकर  हे मराठी कादंबरीकार, लेखक होते. 

📲 मराठी साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

🔻जन्म नाव - गणेश आत्माराम खांडेकर

🔻जन्म - ११ जानेवारी १८९८, सांगली

🔻मृत्यू - ०२ सप्टेंबर १९७६, मिरज

🔻कार्यक्षेत्र - कादंबरीकार

🔻साहित्य प्रकार - कादंबरी

🔻प्रसिद्ध साहित्यकृती - ययाति

🔻वडील - आत्माराम रामचंद्र खांडेकर

🔻पुरस्कार - ज्ञानपीठ पुरस्कार (ययाति १९७४)

✴️वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला.

✴️ इ.स. १९२० साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली.

तेथे त्यांनी इ.स. १९३८पर्यंत काम केले. ह्या काळात त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले.

आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबऱ्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.

✴️'अंतरिचा दिवा' हा खांडेकरांच्या पटकथांचा पुस्तकरूपातील संग्रह आहे.

✴️सुनीलकुमार लवटे यांनी वि.स. खांडेकरांचे चरित्र लिहिले आहे; त्यासाठी डाॅ. अनंत लाभसेटवार यांच्या नागपूर येथील न्यासाने अर्थसाहाय्य केले आहे.

✴️पुरस्कार आणि सन्मान - 

🔸वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

🔸साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी)

🔸पद्मभूषण पुरस्कार (१९६८)

🔸ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठी

🔸कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहाल केली.


🙏 सौजन्य - इंटरनेट वरून ( विकिपीडिया )

Post a Comment

0 Comments