स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धा 2022


स्वच्छ विद्यालय पुरस्कार सन. 2021-22

Swachh Vidyalay Purasakar 2021-22

संदर्भ :

१. शिक्षण मंत्रालय शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांची स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ मार्गदर्शिका 

२. शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.F-27-18/2019-15-9 दि. १० जानेवारी, २०२२. 

३. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०१७/प्र.क्र.१६९/९७ एसडी-६. 

🔺️ शासननिर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

💥 उपरोक्त विषयान्वये संदर्भिय परिपत्रकानुसार भारत सरकारने दि. २ ऑक्टोबर २०१४ पासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केलेली आहे. देशातील सर्व शाळांसाठी सन २०१५-१६ पासून स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरू केलेला आहे. स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ साठी मार्गदर्शक सूचना तसेच शाळांसाठी नामनिर्देशन (Self Nomination) करताना आवश्यक असलेली प्रश्नावली केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर पुरस्काराकरिता नामांकन करणाऱ्या शाळांनी सादर केलेल्या माहितीची पडताळणी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर करण्यात येणार आहे. स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शासकीय अनुदानित व खाजगी शाळा पात्र असून त्यांना या पुरस्कारासाठी नामांकन सादर करता येईल. पुरस्कारासाठी राष्ट्रीय पातळीवर ४६, राज्य पातळीवर २६ व जिल्हा पातळीवर ३८ शाळांची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेकरिता निश्चित करण्यात आलेल्या सहा उपघटकांसाठी ५९ निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत व त्यानुसार शाळांना प्राप्त होणारे गुण विचारात घेवून श्रेणी देण्यात येणार आहे. 

सदर पुरस्कारासाठी शाळांनी नामांकन सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३१ मार्च २०२२ असून शाळांना

https://school.swachhvidyalayapuraskar.com/

या संकेतस्थळावर किंवा गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर वर उपलब्ध असलेल्या Swachh Vidyalay Puraskar 2021-22 या ॲपवर शाळेचा UDISE कोड वापरुन नोंदणी करावी.

🔺️ स्वच्छ विद्यालय पुरस्कार App  खालील लिंकवर CLICK करून Install करता येईल. 👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.glt.svp2122

💥 पुरस्कारासाठी स्तरनिहाय वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

 स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी अधिकाधिक शासकीय अनुदानित व खाजगी शाळांनी सहभागी व्हावे पासाठी आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे. 

🔺️ मार्गदर्शक व्हिडिओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा.



Post a Comment

0 Comments