Earth Day 2022. जागतिक वसुंधरा दिन


 🌍 EARTH DAY 2022 🌍

🌍 जागतिक वसुंधरा दिवस 🌍 

# Vasundhara Divas 

#पृथ्वी दिवस 

22 एप्रिल 2022 

📲 जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.👈

🔻दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस ( Earth Day ) म्हणून साजरा केला जातो.

🔻 अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) गेलार्ड नेल्सन (Gaylord Nelson) यांनी 1970 मध्ये सर्वप्रथम अर्थ डे (Earth Day) ही संकल्पना मांडली. तेव्हापसून 22 एप्रिल हा दिवस प्रतिवर्षी वसुंधरा दिन (Vasundhara Day) म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे एका अर्थाने गेलार्ड नेल्सन हे या दिवसाचे जनक आहेत असे मानले जाते. गेलार्ड हे पर्यावरण प्रेमी होते. अमेरिकेत त्यांनी 2 कोटींपेक्षाही अधिक नागरिकांमध्ये पर्यावरण आणि पर्यावरणीय समस्या यांबाबत जनजागृती केली. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या उद्योग, विकास आणि समुहाला त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी सरकारवर मोठा राजकीय दबाव निर्माण करण्यास गेलार्ड यशस्वी झाले. तेव्हापासून पर्यावरणाचे महत्त्व ध्यानात घेऊन वसुंधरा दिन (Vasundhara Day) जगभरात साजरा करण्यात येऊ लागला.

🔻पर्यावरणरक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने २२ एप्रिल, इ.स. १९७० रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले. पहिला पृथ्वी दिन अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेला डेनिस हेस याने स्थापलेल्या संस्थेने इ.स. १९९० साली १४१ देशांमध्ये या दिवसाचे आयोजन करून पृथ्वी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. सध्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या समन्वयाने १७५ देशांमधून हा दिवस साजरा केला जातो. इ.स. २००९ साली संयुक्त राष्ट्रांनी २२ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय धरणीमाता दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली.

🔻पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंधकारमय आहे. अशात आपल्या पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

🔻पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंधकारमय आहे. अशात आपल्या पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

✴️ सुरुवात व मूळ संकल्पना :

 अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी वसुंधरा दिनाची संकल्पना मांडली. त्यांनी अमेरिकेतील लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा ऱ्हास या मुद्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला आणि राजकीय दबाव निर्माण झाला अशा प्रकारे 1970 सालापासून हा ‘जागतिक वसुंधरा दिन’ अर्थात ‘अर्थ डे’ जगभर साजरा केला जात आहे.

💁‍♂ आपण काय करू शकतो ?

▪ नैसर्गिक ऊर्जास्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देऊया.

▪ अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

▪ शक्य असेल तेवढी झाडे लावूया, तसेच लावलेल्या झाडांचे रक्षण करूया.

▪ जमीन व जल प्रदूषण करणार्‍या प्लास्टिकचा वापर टाळूया.

▪ पृथ्वीचे तापमान वाढणार्‍या घटकांचे उत्सर्जन कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो.

▪ टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना दैनंदिन जीवनात अंमलात आणूया.

▪ शालेय स्तरापासून मुलांमध्ये पर्यावरणाविषयी आस्था निर्माण करून जबाबदारीची जाणीव करून देऊया.

▪ वने, वन्यप्राणी निसर्गाचा अविभाज्य घटक असून पर्यावरण संतुलनात पर्यायाने पृथ्वीच्या वातावरणीय समतोलामध्ये या घटकांची महत्वाची भूमिका आहे हे जनमानसात ठसवूया.

▪ निसर्गाने दिलेल्या साधन-संपत्ती जपून वापरूया आणि गरजेपुरती वापरूया.

▪ साधन-संपत्तीचा प्रमाणापेक्षा अधिक वापर कमी करूया व भावी पिढीसाठी जतन करूया.

▪ पर्यावरण रक्षण हे आद्य कर्तव्य समजून वसुंधरेला स्वच्छ व सुजलाम् सुफलाम ठेवण्यासाठी रोजच वसुंंधरा दिन करूया.

🤝 संकल्प करूया : 

हरित वसुंधरेचे विश्वस्त या नात्याने संकल्प करूया, 

वनसंवर्धनाचा, 

ऊर्जा-पाणी बचतीचा,

 समृद्ध भविष्याचा नवनिर्मितीचा.

🔻पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचे

🔸वृक्षारोपण करावे आणि वृक्षतोड कमी करावी.

🔸नद्याचे जल स्वछ ठेवावे.

🔸आपल्या सभोवतालच्या पर्यावरणात स्वच्छता राखणे.

🔸शेतीत जैविक खतांचा वापर करा, रासायनिक खाते कमी वापर.



Post a Comment

0 Comments