UDISE PLUS - Year 2021-2022
यु डायस प्लस २०२१-२०२२
🔻UDISE+ शालेय प्रोफाइल, भौतिक पायाभूत सुविधा, शिक्षक, नावनोंदणी, परीक्षा निकाल इ. ऑनलाइन डेटा कलेक्शन फॉर्म (DCF) द्वारे माहिती संकलित करते.
🔻DCF अकरा विभागांमध्ये विभागले गेले आहे आणि प्रत्येक विभागात शाळेचे विविध कार्यप्रदर्शन निर्देशक कॅप्चर करण्यासाठी अनेक प्रश्न आहेत.
✴️ सन २०२१-२२ यु - डायस प्लस माहिती संगणकीकरण व संकलनाचे मार्गदर्शन सूचना -
समग्र शिक्षा या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता जिल्ह्यातील शाळांची अद्यावत माहितीची आवश्यकता व अंमलबजावणी करण्यासाठी सोयीसुविधांची , शिक्षक , विद्यार्थी , मोफत पाठपुस्तके , गणवेश , दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयीसुविधांची माहिती ऑनलाईन पध्दतीने यु - डायस प्लस प्रणालीमध्ये माहे ३१ मे , २०२१ पर्यत यु - डायस प्लस प्रणालीमध्ये अद्यावत करुन पुर्ण करण्याकरिता कळविले आहे.
जिल्हा / महानगरपालिका / तालुका/ केंद्र शाळा स्तरावरुन पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
✴️ शाळास्तरावरुन करण्यात येणारी कार्यवाही :
• शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिळालेल्या युजरनेम व पासवर्ड द्वारे शाळेतील बदल झालेल्या सोयीसुविधांची माहिती यु - डायस प्लस प्रणालीमध्ये १५ मे २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. माहिती प्रणालीमध्ये अद्यावत करणे पूर्ण झाल्यानंतर माहिती अचूक असल्याचे Self Declaration प्रमाणपत्र Upload करावे .
• सन २०२१-२२ या वर्षाकरिता शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिळालेल्या युजरनेम व पासवर्डद्वारे सोयीसुविधांमध्ये बदल झाल्यास , विद्यार्थी संख्येत बदल झाले असल्यास , शिक्षकांच्या माहिती मध्ये बदल असल्यास त्याच माहितीमध्ये बदल करण्यात यावा व इतर माहिती पुन्हा यु - डायस प्लस प्रणालीमध्ये नोदविण्याची गरज नाही.
शाळेच्या मुध्यापकांनी शाळेची माहिती पुर्ण भरुन झाल्यानंतर School Report Card व भरलेले यु - डायसचे प्रपत्र माहितीसाठी डाऊनलोड करुन घ्यावे . शाळेची माहिती भरताना मुख्याध्यापकांना अडचणी येत असल्यास त्यांनी केंद्रपमुख , गटशिक्षणाधिकारी , राज्य / जिल्हा / तालुका स्तरावरील संगणक प्रोग्रामर / MIS Co - ordinator / Data Entry Operator यांच्या मदतीने यु - डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती नोंदविण्याचे काम पूर्ण करुन घेण्यात यावे.
✴️यु - डायस माहितीचा उपयोग : राज्य / जिल्हा / तालुका स्तरावरील संगणक प्रोग्रामर / MIS Co ordinetor यांनी यु- डायस प्लस या संकेतस्थळावर प्राप्त होणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने जिल्हा / तालुका / केंद्र / शाळा निहाय माहितीचे विश्लेषण करुन अहवाल तयार करावा व योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांना योजनांचे नियोजन व अंमलबजावणी करण्याकरिता माहिती उपलब्ध करुन देण्यात यावा . भारत सरकारकडून सन २०२१-२२ या वर्षामध्ये यु - डायस प्लस या ऑनलाईन प्रणाली ही नवी दिल्ली NIC यांच्याकडून संचालित करण्यात आली असून
या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत . राज्यातील सर्व शाळांची माहिती अंतिम झाल्यानंतर शाळांचे स्कूल रिपोर्ट कार्ड जनसामान्यांकरिता
या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे तसेच जिल्हानिहाय शाळा , संवर्गनिहाय शाळा , व्यवस्थापन निहायशाळा , विद्यार्थी , दिव्यांग विद्यार्थी , शिक्षक व भौतिक सुविधांची
http://dashboard.udiseplus.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे .
👉 सन २०१८-१९ व २०१ ९ -२० या वर्षामधील शाळांची माहीती उपलब्ध करुन देण्यात आली आहे .
✴️ सन. 2021-22 ची Udise plus ची माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈
✴️ सन. 2021-22 ची Udise plus ची माहिती भरण्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी.
👉 सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा.
https://udiseplus.gov.in/udiseplus/home
👉 त्यानंतर लॉगिन page ओपन होईल. त्यात BRC कडून मिळालेला User name व Password टाका. तसेच त्याखाली दिलेला CAPCHA Code टाकून login करा.
👉 Login झाल्यानंतर आपली शाळा ओपन करा व त्यात दिलेली माहिती भरा/ update करा.
✴️ UDISE PLUS कोरा फॉर्म ( पूर्ण ) मराठी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
✴️ UDISE PLUS कोरा फॉर्म ( पूर्ण ) इंग्रजी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
✴️ Udise plus संदर्भातील परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.👈
✴️ सन. 2021-22 Udise plus माहितीचे संगणकीकरण व संकलनाचे मार्गदर्शन सूचना ( Guidelines ) 👈

0 Comments