World Book Day जागतिक पुस्तक दिवस

 


World Book Day 📚📚📖

जागतिक पुस्तक दिवस 📖📚🌍

23 एप्रिल 2022 

📲 जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

✴️संपूर्ण जगभरात २३ एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा केला जातो.

नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचं खास उद्दिष्ट्य आहे.

✴️ जागतिक पुस्तक दिन हा 23 एप्रिल दिवशी साजरा केला जातो. UNESCO सह जगभरातील साहित्य संबंधित संस्थांकडून दरवर्षी जागतिक पुस्तक दिनाचं सेलिब्रेशन केलं जातं. हा दिवस जगभरातील 10 देशांमध्ये साजरा केला जातो. आजच्या दिवशी जागतिक पुस्तक दिनासोबत World Book and Copyright Day देखील आजचं साजरा केला जातो. 'युनेस्को'कडून या दिवसाचं सेलिब्रेशन करताना William Shakespeare, Miguel Cervantes आणि Inca Garcilaso de la यांना आदरांजली म्हणून आजची तारीख निवडली गेली आहे. युनेस्कोच्या पॅरिसमधील सर्वसामान्य सभेमध्ये 1995 साली जगभरातील लेखल आणि पुस्तकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा करण्यास सुरूवात झाली.

✴️23 एप्रिल 1564 दिवशी महान कवी, लेखक,नाटककार शेक्सपियर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अनेक नाटकांचा, साहित्यकृतींचा भारतासह जगभरातील विविध भाषांमध्ये भाषांतरही झाले. त्यांनी 35 नाटकं आणि 200 पेक्षा अधिक कविता लिहल्या आहे. साहित्य जगतामध्ये शेक्सपियर यांना असलेल्या आदराच्या स्थानामुळे युनेस्कोने 1995 साली तर भारत सरकारने 2001 साली 23 एप्रिल दिवशी जागतिक पुस्तक दिन सेलिब्रेशनची घोषणा केली.

✴️हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतींनी साजरा केला जातो. काहीजण पुस्तके विनामूल्य वितरित करतात, तर कुठे स्पर्धा आयोजित केली जाते. स्पेनमध्ये दोन दिवस रीडिंग मॅरेथॉनचं आयोजन केलं जाते. या मॅरेथॉनअखेरीस एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डे सर्व्हांटिस पुरस्कार दिला जाते. स्वीडनमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन स्पर्धा घेतल्या जातात.

✴️📚 जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 🙏💐

📚 *WORLD BOOK DAY जागतिक पुस्तक दिवस* 📚

▪️ *अभ्यासासोबत इतर अवांतर पुस्तके वाचा व ज्ञान वाढवा.* 📚

📱 *विद्यार्थ्यांसाठी वाचनीय गोष्टींची पुस्तके.* 👇🏻

https://moykhede.blogspot.com/p/vacha.html?m=1


📱 *विज्ञान विषयक पुस्तके* 👇🏻

https://moykhede.blogspot.com/p/blog-page_10.html?m=1


📱 *किशोर मासिक* 👇🏻

https://moykhede.blogspot.com/p/blog-page_6.html?m=1


📱 *चांदोबा मासिक* 👇🏻

https://moykhede.blogspot.com/p/blog-page_91.html?m=1


📱 *गणित विषयाची मनोरंजक व परिपूर्ण माहिती असलेली पुस्तके*👇🏻

https://moykhede.blogspot.com/p/blog-page_58.html?m=1





Post a Comment

0 Comments