Online Teacher Transfer शिक्षक बदली प्रक्रिया.

 

💥 ऑनलाइन  शिक्षक बदली पोर्टल 2022 - शिक्षक बदली प्रक्रिया 
Online Teacher Transfer 

👉आंतरजिल्हा बदल्या सुरू झाल्या आहेत. 
🔻शिक्षक आजपासून आंतरजिल्हा अर्ज भरू शकतात.
🔻 सर्व शिक्षकांसाठी एनओसी , संवर्ग -1 , संवर्ग -2 , सर्वसाधारण ( General ) अर्ज भरण्याची तारीख सुरू झाली आहे. 
🔻शिक्षक हा अर्ज 09/08/2022 मध्यरात्री 12:00 पर्यन्त भरू शकतील. 
🔻सर्व BEO , EO , शिक्षकांना संदेश प्रसारित करा जेणेकरून फॉर्म वेळेवर भरता येतील आणि सबमिट करता येतील. ✴️महत्वाच्या सूचना - 
1. एक शिक्षक फक्त एका संवर्गात फॉर्म भरू शकतो .
 2. जर शिक्षक संवर्ग -1 किंवा संवर्ग -2 असेल आणि त्याच्याकडे NOC असेल तर त्याला कोणत्या श्रेणीत फॉर्म भरायचा आहे हे त्याला ठरवायचे आहे .
 3. ग्रामविकास विभागाकडील दि . 10 जून , 2022 च्या पत्रातील निर्देशानुसार आंतरजिल्हा बदली प्रकरणात ना हरकत प्रमाणपत्र ( NOC ) धारक शिक्षकांनी , त्यांना ज्या जिल्हा परिषदेकडे जायचे आहे , त्या जिल्हा परिषदेने दिलेल्या ना - हरकत प्रमाणपत्राचा ( NOC ) क्रमांक व दिनांक नमूद करणे आवश्यक आहे . 
4. ज्या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त शिक्षक घोषित केले गेले आहेत ते रोस्टरमध्ये रिक्त जागा वजा दाखवतील. अशा परिस्थितीत जोपर्यंत अतिरिक्त शिक्षक या जिल्ह्यातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत इतर जिल्ह्यातील एकही शिक्षक या जिल्ह्यात येऊ शकत नाही . 
5. ज्या जिल्ह्यामध्ये रोस्टर शून्य आहे त्या जिल्ह्यामध्ये बदल्या साखळी पद्धतीने होतील जर त्या जिल्ह्यातून एखाद्या शिक्षकाची बदली झाली तरच त्या जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्यातून शिक्षक बदलीने येतील . 
6. संवर्ग -2 मध्ये ( Both in ZP ) ( प्राथमिक व्यतिरिक्त / other than primary ) निवडल्यावर तुम्हाला सेवार्थ आयडी / शालार्थ आयडी आणि जोडीदाराचे नाव प्रविष्ट करणे आवश्यक आहे जे अनिवार्य आहे आणि UDISE कोड आणि शाळेचे नाव अनिवार्य नाही ( रिक्त सोडले जाऊ शकते ).
7. एकदा फॉर्म सबमिट केल्यावर फॉर्म संपादित किंवा अद्यतनित करण्याचा कोणताही मार्ग नाही आणि म्हणून शिक्षकांनी फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक भरले पाहिजेत . 
8. बिंदुनामावली मधील रिक्त जागा पाहूनच आपला बदलीचा अर्ज पोर्टलवर भरावा. 

📲 आंतरजिल्हा बदली प्रक्रिया - संवर्ग 1 अर्ज कसा भरावा ? मार्गदर्शक व्हिडिओ - भाग एक 👇

📲 आंतरजिल्हा बदली प्रक्रिया - संवर्ग 2 अर्ज कसा भरावा ? मार्गदर्शक व्हिडिओ - भाग दोन 👇

✴️ आंतर जिल्हा बदली - रोस्टर ( सर्व जिल्हे ) 👇

💥 शिक्षक बदली पोर्टल ( नवीन वेबसाईट) 👇

https://ott.mahardd.in


   💥 *Phase-1 मधील टप्पे* 💥

⭕ *पहिला टप्पा-*

*सर्व कार्यरत 100% शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट करणे व Verify करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे Submit करणे.*

   *नवीन वेळापत्रकानुसार-*

_कालावधी-13 जून ते  27 जून_

⭕ *दुसरा टप्पा-*

*गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व शिक्षकांचे प्रोफाईल तपासणे व Verify करून Accept करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठविणे.*

_कालावधी-13 जून ते  29 जून_

⭕ *तिसरा टप्पा-*

*गटशिक्षणाधिकारी यांनी Verify केलेली किंवा बदल केलेली माहिती शिक्षकांना मान्य नसेल तर शिक्षणाधिकारी यांच्याकडे appeal करणे.*

_कालावधी-14 जून ते  01 जुलै_

⭕ *चौथा टप्पा-*

*शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी शिक्षकांचे शिक्षकांचे appeal तपासून Verify करणे व Accept करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठविणे.*

_कालावधी-14 जून ते  03 जुलै_

⭕ *पाचवा टप्पा-*

*गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांनी Verify केलेले प्रोफाईल शिक्षकांनी Accept करणे.शिक्षकांनी प्रोफाईल Accept केल्यानंतर बदली प्रक्रिया संपेपर्यंत पुन्हा कोणत्याही टप्प्यावर बदल करता येणार नाहीत.*

_कालावधी-14 जून ते  05 जुलै_

⭕ *सहावा टप्पा-*

*जे शिक्षक जाणीवपूर्वक बदली प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी प्रोफाईल अपडेट करणार नाहीत किंवा वरील टप्प्यांमध्ये सहभागी होणार नाहीत, आशा शिक्षकांचे प्रोफाईल गटशिक्षणाधिकारी सक्तीच्या स्वीकृतीने (Force Acceptence)  Accept करतील.*

_कालावधी-06 जुलै ते 08 जुलै_

⭕ *सातवा टप्पा-*

*वरील 6 टप्पे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रोफाईल Acceptence 100 % पूर्ण झाल्यानंतर शिक्षक इतर सर्व शिक्षकांचे प्रोफाईल पाहू शकतील.चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर आक्षेप घ्यायचा असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे Social appeal करता येईल.*

_कालावधी-24 जून ते  10 जुलै_

⭕ *आठवा टप्पा-*

*शिक्षकांनी केलेल्या Social appeal वर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनावणी घेऊन निर्णय घेतील.*

_कालावधी-11जुलै ते  13जुलै_

🙏 सौजन्य -

*बदली व पोर्टल मदत केंद्र-बार्शी*

*श्री.दत्तात्रय पाटील- 9421874085*

*श्री.मोहन पवार- 9423993146*

💥 शिक्षक प्रोफाईल अपडेट करणे. 
👉Step by Step Guide -

👇 Online Teacher Transfer Portal ( ottportal ) 

💥 बदली पोर्टलला माहिती भरणेबाबत, तसेच शिक्षक प्रोफाइल अपडेट करणे बाबत अधिकृत व्हिडिओ (विन्सिस सॉफ्टवेअर कंपनीद्वारे)👇👇👇

https://youtu.be/ZnVIssAcZmE 

💥 बदली पोर्टल - शिक्षक प्रोफाइल अपडेट करणे - संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती ( pdf स्वरूपात ) पहा/ डाऊनलोड करा. 👇

https://bit.ly/3OsHc9p 

💥 शिक्षक बदली प्रक्रिया - मार्गदर्शक व्हिडिओ - तुमचे प्रश्न, आमचे उत्तर ( भाग १) 👇

https://youtu.be/pprDcbr5ND0

📲  बदली पोर्टलला लॉगीन कसे करावे -

👉 सर्वप्रथम 

https://ott.mahardd.in

या लिंक वर क्लिक करा.

👉 त्यानंतर Login page ओपन होईल. त्यात तुमचा Registered mobile no. टाका व Sent OTP वर क्लिक करा. 

👉 तुमच्या मोबाईल वर OTP येईल तो तेथे खाली टाका. तसेच तेथे दिलेला Capcha code टाका व Login वर क्लिक करा. 

👉🏻 बदली पोर्टलला लॉगीन केल्यानंतर काही सूचना वाचायच्या आहेत. आणि Accept करायच्या आहेत.

👉🏻 बाजूला Profile दिसते. त्यावर Click करा.

👉🏻 Profile दोन फेज मध्ये आहे. Personal Details व Employment Details.

👉🏻 profile अपडेट करण्याची सुविधा दि. 13-06-2022 ते 20-06-2022 पर्यंत आहे,


💥 ऑनलाईन बदली प्रक्रियेतील काही महत्वपूर्ण संबोध :-

🔻Personal details मधील माहिती आपणास बदल करता येत नाही. या माहितीमध्ये चुका असतील तर BEO कार्यालयाशी संपर्क साधावा. 
शिक्षक बदली पोर्टल अपडेट करताना खालील बाबीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे - 

👉 Personal Details
 मधील माहिती आपणास अपडेट करण्यासाठी edit होणार नाही,
Personal details मध्ये काही बदल करायचा असेल तर brc मार्फत जिल्हा लॉगीनला request करू शकता, जिल्हा लॉगिन सिस्टिम ला आपली Reuest पाठवावी, पण या कामासाठी वेळ लागत आहे, कारण बदली पोर्टल sytem राज्य स्तरावर काम करत असल्याने राज्य भरातून त्यांना माहिती बदल करण्यासाठी विनंती येत आहेत,आपण वैकतीक सुद्धा dashboard मधील सर्वात शेवटचा मेनू help मधून आपण पोर्टल ला विनंती करू शकता,
(ज्यांचे अद्याप लॉगिन होत नाही अश्या शिक्षकांचे लवकरच लॉगिन सुरू होईल)

👉 आपण Employee Details मध्ये स्वतःची माहीत बदल करून सेव करू शकता,आपण बदललेली माहिती preview पाहू शकता,बदल योग्य असेल तर save करून ती submit करू शकता,सबमिट झालेवर ही माहिती Beo लॉगिन ला जाईल ,एकदा का आपण माहिती submit केले की आता आपण पोर्टल लॉगिन करून आपली माहिती edit करून त्यात  शिक्षक लॉगिन वरून बदल नाही करू शकत,

👉 Employee Details मध्ये मुद्देनिहाय खालील प्रमाणे माहिती अपडेट करू घ्यावी,अशी माहिती अपडेट करून झाल्यावर  आपणास हिरव्या रंगाचा successfully Save असा मेसेज स्क्रीनवर दिसेल.

💥 Employee Details - 

 👉 Date of  appointment in zp - 
 इथे आपण जि.प सेवेत कधी आलात ती तारीख लिहा, मग ती राज्यातील कुठलीही zp असो. जे पाहिल्यापासून एकाच ZP त आहेत ते पहिल्यांदा शाळेवर उपस्थित झाले ती तारीख लिहितील.

👉 cast category -  इथे आपण ज्या जात संवर्गाचे असाल ते निवडावे.

👉 Appoinment category - 

इथे आपण open,sc,st,obc nt किंवा इतर कुठल्याही जात संवर्गाचे असाल पण आपली नेमणूक ज्या संवर्गातून झाली असेल ते निवडावे (उदा.आपण Obc जात संवर्गातील असाल परंतु आपली नियुक्ती जर ओपन मधून झाली असेल तर आपली या रकान्यात open असे निवडावे. (प्रथम नेमणूक आदेशावर आपणास ही माहीती मिळेल की आपली निवड कोणत्या संवर्गातून झाली आहे.)

👉 Current dist joining date - 
आपण सध्या कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील प्रथम नेमणूक ( रुजू )  दिनांक टाकावी,
जर आपण आंतर जिल्हा बदलीने सध्याच्या zp मध्ये आला असाल तर सध्या कार्यरत जिल्हा उपस्थिती दिनांक टाकावी.

👉 Udise code of current school- 
सध्या आपण कार्यरत शाळेवरील udise code टाकावा.

👉 Current teacher type -
 पदवीधर शिक्षक येथे graduate निवडतील, इतर सर्व शिक्षक under gradute निवडतील.

👉 Teacher sub type- 
 हे फक्त वरील मुद्यात graduate टिचर ज्यांनी निवडले आहे तेच विज्ञान,गणित,सोशल इत्यादी निवडतील, undar graduate teacher इथे NA निवडतील.

👉 Teaching medium -
आपण ज्या माध्यमाच्या शाळेत शिकवीत आहेत ते माध्यम निवडावे.

👉 Last transfer category 
इथे आपण drop down मेनू मधून संवर्ग 1,2,3,4 असा अर्थ घ्यावा. जर आपली शेवटची  बदली ऑफलाईन बदली झाली असेल ( समायोजन )  तर NA निवडावे.

🔻Last Transfer Category :
1) Cadre 1- संवर्ग 1
2) Cadre 2- संवर्ग 2
3) Entitled - संवर्ग -3
4) Eligible- संवर्ग -4
5) NA- लागू नाही
👉 last transfer type
आपली शेवटची बदली जिल्हाअंतर्गत असेल तर आपण intra निवडावे,जर आंतर जिल्हा बदली असेल तर inter निवडावे,

👉 have you been suspend in last 10 years  आज पासून मागे 10 वर्षात जर आपण कधी suspend झाला असेल तर yes  निवडावे, नसाल तर no निवडावे

💥 पात्र शिक्षक यांनी आपले प्रोफाइल तात्काळ अपडेट करून घ्यावी, व सबमिट करावी. दि.20 जून अपडेट साठी शेवटची तारीख आहे.

♦️ सर्व शिक्षकांना आपली प्रोफाईल अपडेट करावी लागणार आहे.

💥 Vinsys IT Services या कंपनी द्वारे बदली प्रक्रिया होणार असून 
शिक्षक बदली प्रक्रिया 3 Phase मध्ये होणार आहे.
1) Phase 1 : शिक्षक माहिती updation
2) Phase 2 : आंतरजिल्हा बदली
3) Phase 3 : जिल्हांतर्गत बदली

👉 सध्या Phase 1 सुरू झालेले असून Phase 1 पूर्ण झाल्यानंतरच Phase 2   व 3 सुरू होईल.

💥 Phase 1 मध्ये खालील प्रकारे प्रक्रिया असेल-
🔻 शिक्षकांना त्यांचा मोबाईल नं व OTP ने लाँगीन करावं लागेल
🔻 तिथे आपणास शिक्षक माहिती चे दोन भाग दिसतील
I) Personal Information 
ii) Employee Information
🔻 Personal Information read only Mode मध्ये असेल तिथे आपणास बदल करता येणार नाही.
🔻 Employee information मध्ये माहिती बरोबर असल्यास माहिती accept करावी. व त्रुटी दिसल्यास दुरुस्ती करावी व submit करावी.
 
🔻 Submit केलेली माहिती BEO level ला जाईल. BEO सेवापूस्तकां नुसार माहिती तपासून approved करतील. तसेच आलेली माहिती चूक आढळल्यास दुरुस्ती करतील.
 
🔻 सदर माहिती शिक्षक लाँगीन ला दिसेल. ती माहिती बरोबर असल्यास शिक्षकांनी accept करावी.
🔻 BEO यांनी दुरुस्ती केलेली माहिती योग्य असल्यास Accept करावे. माहिती मान्य नसल्यास शिक्षक आपली माहिती मध्ये बदल करुन EO कडे अपील करु शकतील.
 
🔻 EO कडे आलेली माहिती, EO योग्य पुराव्यानिशी माहिती approved किंवा बदल करतील.
🔻 EO नी मंजूर केलेली माहिती आता final असेल.
🔻 तसेच सर्व शिक्षकांची माहिती सुद्धा प्रत्येक शिक्षकांना आपल्या login मध्ये बघता येईल. एखाद्या शिक्षकांस दुसऱ्या एखाद्या शिक्षकांच्या माहिती मध्ये दोष दिसल्यास त्यांच्या विरोधात CEO कडे Social अपील करता येईल. CEO योग्य पुराव्यानिशी सदर शिक्षकांच्या माहिती मध्ये योग्य बदल करतील.

🔻अशा प्रकारे Phase 1 प्रत्येक शिक्षकांना दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. 
 
🔻 अंतिम दिनांक पर्यंत शिक्षकांनी आपली माहिती Accept न केल्यास BEO आपल्या अधिकाराचा वापर करून सर्व शिक्षकांची माहिती approved करतील. त्यांनंतर शिक्षकांना आपली माहिती update करण्याची संधी असणार नाही.
🔻 प्रत्येक क्षणी व प्रत्येक स्तरावर माहिती update करतांना OTP आवश्यक असणार आहे.
 
🔻 बदली प्रक्रियेत कुठल्या स्तरावर काय कसे बदल केले याची संपूर्ण माहिती शिक्षकांना email वर तसेच login मध्ये कळेल.

Post a Comment

0 Comments