National Scholarship Portal
प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2022-23
✴️ अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी नवीन अर्ज व नुतनीकरणासाठी 15 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
✴️ सन. 2022-23 साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थी 2022-23 मध्ये 20 जुलै 2022 पासून शिष्यवृत्तीसाठी (नवीन आणि नूतनीकरण) अर्ज करू शकतात.
👉 *अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बाबत -
सर्व शाळांनी शाळेचे प्रोफाइल अपडेट करावयाचे आहे शाळेचे प्रोफाईल अपडेट केले शिवाय NSP पोर्टल वर ती कोणत्याही विद्यार्थ्यांचा अर्ज पडताळणी करता येणार नाही याची नोंद घ्यावी..(नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यापूर्वी सर्व शाळांनी आपले प्रोफाइल अपडेट करावे)*
*शाळेचे प्रोफाईल update करण्यासाठी NSP portal open करून institute login page open करा.*
लॉगिन type institute nodal निवडा.
शैक्षणिक वर्ष 2022-23 निवडा.
Login ID व पासवर्ड टाका.
Captcha code टाकून लॉगीन करा.
Administration मेनू open करून update profile वरती click करा.
👉Institute details मध्ये शाळेची माहिती पुढील प्रमाणे भरा.
शाळेचे नाव as per nsp/ as per dise या पैकी जे बरोबर असेल ते निवडा. तुम्ही जे न निवडाल त्यावरीलच जिल्हा निवडला जाईल.(as per nsp किंवा as per dise)(काही शाळांचा जिल्हा चुकीचा दाखवत असेल त्यांनी याद्वारे दुरुस्त करून घ्या.)*
शाळेचा प्रकार निवडा (शासकीय/खाजगी/अनुदानित..... इ.)
बोर्ड व राज्य निवडा.
शाळेचा पत्ता अचूक भरा.
👉Contact person details मध्ये शाळेच्या नोडल ऑफिसर यांची माहिती भरा.
👉यामध्ये आधार कार्ड वरती जी माहिती आहे तीच माहिती पुढील प्रमाणे भरा.
👉आधार नंबर, आधार कार्ड वरील नाव, जन्म तारीख, लिंग, मोबाईल नंबर, email , पद ई.(नोडल ऑफिसर हे शाळेचे मुखाध्यापक किंवा मुख्याध्यापकांनी नेमलेले शाळेचे कर्मचारी असावेत.)(नोडल ऑफिसर यांची माहिती आधार वरील माहितीशी मॅच झाल्यानंतर otp येईल त्यानंतरच तुम्ही प्रोफाईल update करू शकाल त्यामुळे सर्व माहिती अचूक भरा.)
👉शाळेच्या नोडल ऑफिसर यांची माहिती भरून झाल्यानंतर institute Head Login या लॉगिन मधून शाळेच्या मुख्याध्यापक यांची माहिती भरा.
👉Head of institute मध्ये शाळेच्या मुख्याध्यापक यांची माहिती भरा.
👉मुख्याध्यपक यांचे आधार कार्ड वरील नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल, पद इत्यादी.
👉सर्व माहिती अचूक भरले नंतर final submit या बटणावर क्लिक करा.
🔻धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार केंद्र शासनाने अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या इयत्ता १ ली ते १० वी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी शासननिर्णय.क्रमांक.पंपका-2007/270/07असंक दिनांक 23 जुलै 2008 अन्वये राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, पारशी व जैन या धार्मिक अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2008-2009 पासून सुरू झाली आहे.
👉 चालू वर्षी NSP 2.0 पोर्टल वरती नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक 20/07/2022 पासून सुरू झाली आहे. इयत्ता १ ली ते १० वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाद्वारे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.
🔻कालावधी :- नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2022
🔻अटी व शर्ती :-
इयत्ता १ ली ते १० च्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय/ निमशासकीय/ खासगी अनुदानित/ विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शासन मान्यता प्राप्त शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी योजना ही लागू आहे.
अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्केपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
पालकांचे (कुटुंबातील एकत्रित) वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावे.)
पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.
एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.
अर्ज भरताना विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, बँक व आधारची माहिती अचूक भरावी.
धर्माबाबतचे स्वयंघोषणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, आधारकार्ड/ आधार नोंदणी पावती, विद्यार्थ्याचा फोटो, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करावीत.
हया शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.
एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव आहे.
🔻सर्वसाधारण सूचना :-
सन 2021-2022 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या/ शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि यावर्षी शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सन 2022-23 करिता नूतनीकरण विद्यार्थी म्हणून अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.
नवीन अथवा नूतनीकरण यापैकी एकाच प्रकारचा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येईल. तसेच एका विद्यार्थ्याने नवीन /नूतनीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरवले जातील.
विद्यार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेचे असावे. नसल्यास पालकांचे राष्ट्रीयीकृत बँक खात्याची माहिती अर्जात भरता येईल.
इयत्ता पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज National Scholarship Portal (NSP 2.0) ( www.scholarships.gov.in) या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहील. (टीप :- हे अर्ज भरण्याची सोय www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे)
अर्ज भरताना भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. हा क्रमांक पालकाचा असेल तर तो दोन पाल्यांसाठी वापरता येईल.

0 Comments