Mid Day Meal Scheme
MDM BACK DATED ENTRY
मध्यान्ह भोजन योजना
मागील राहिलेली दैनंदिन माहिती ( उपस्थिती ) भरणे सुरू.....
🔻प्राथमिक शिक्षण संचालनालयातील शालेय पोषण आहार कक्षाने दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
🔻 शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमार्फत दैनंदिन आहार घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या उपस्थितीची माहिती MDM पोर्टलवर मोबाईल ॲप व वेबपोर्टल च्या माध्यमातून अद्यावत करण्यात येते. शाळांनी ऑनलाइन भरलेल्या माहितीच्या आधारे इंधन, भाजीपाला तसेच धान्यदी मालांची देयके जनरेट करण्यात येऊन शाळांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येते. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षापासून शाळांचे ऑनलाईन उपस्थिती माहिती भरण्याचे काम बंद असणे तसेच दरम्यानच्या कालावधीमध्ये कोरड्या स्वरूपातील धान्य मालाचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आल्यामुळे ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्यात आलेली नाही. माहे मार्च 2022 पासून शाळा स्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तथापि अनेक शाळांचे ॲप अद्यावत नसणे शिक्षकांची नोंदणी नसणे किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे दैनंदिन उपस्थितीची माहिती भरण्याचे प्रलंबित असल्याचे निवेदने संचालनालयास प्राप्त झाली आहे.
🔻 याबाबत सर्व जिल्ह्यांना सुचित करण्यात येते की शाळांनी मागील कालावधीतील माहे मार्च ते सप्टेंबर 2022 अखेर दैनंदिन प्रलंबित उपस्थिती भरण्याकरिता केंद्रप्रमुख लॉगिन तथा तालुका लॉगिन वर दिनांक 1 ऑक्टोबर 2022 ते 6 ऑक्टोबर 2022 या दरम्यान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदरच्या कालावधीत आपल्या जिल्ह्यातील काही शाळांनी दैनंदिन उपस्थिती भरण्याची प्रलंबित असल्यास सदर दैनंदिन माहिती अद्यावत करून घेण्यात यावी. तदनंतर तसेच संचालनालय स्तरावरून देयके जनरेट करण्यात आल्यानंतर अशा प्रकारची कोणतीही सुविधा शाळांना उपलब्ध करून देण्यात येणार नसल्याबाबतचे शाळांना अवगत करून देण्यात यावे. तसेच शालेय पोषण आहार योजनेस पात्र सर्व शाळा MDM पोर्टलवर उपस्थितीची माहिती अद्यावत करीत असले बाबत नियमितपणे आढावा घेण्यात यावा.
✴️सध्या शाळेत शालेय पोषण आहार सुरु झालेला आहे. त्यासाठी आपली दररोजची मध्यान्ह भोजन योजनेत उपस्थित विद्यार्थ्यांची नोंदणी करावयाची असते. ही नोंदणी आपल्याला app किंवा वेबसाईटवर भरता येते. app वरून माहिती भरण्यासाठी आपल्याला सुरुवातीला ते डाऊनलोड करून घ्यावे लागेल.
👉MDM APP डाउनलोड करण्यासाठी खालील बटनाला क्लिक करा.👇
✴️ MDM ची मागील दिवसांची राहिलेली दैनंदिन उपस्थिती भरण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.
🔻 सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा. 👇
https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/5
🔻 त्यानंतर एक विंडो ओपन होईल त्यात User Id ( तुमच्या केंद्राचा - Cluster Udise टाका. )
त्यानंतर password व capcha code टाका व लॉगिन करा.🔻 लॉगिन झाल्यानंतर ज्या तारखेची माहिती भरावयाची असेल ती तारीख select करा. त्यानंतर Cluster वर क्लिक करा.
🔻 त्यानंतर केंद्रातील शाळांची नावे दिसतील. त्यापैकी आपल्या शाळेसमोर असलेल्या टॅब वर क्लिक करून माहिती भरा.


.gif)
0 Comments