जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सन. 2022-23

 

 जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सन. 2022-23 

Intra-District Transfer Procedure  2022-23

जिल्हा अंतर्गत बदली विशेष 

म.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पोर्टलवर आज  रिक्त पदांची यादी जाहीर करण्यात येईल.

विशेष संवर्ग 1 व 2 चे अर्ज भरण्याची मुदत दिनांक 18/11/2022 ते 20/11/2022 आहे. 

✴️  विशेष संवर्ग 1 व 2 मधून ज्या शिक्षकांना अर्ज करायचा  आहे त्यांनी पोर्टल वर लॉगिन करून या तीन दिवसात आपले अर्ज भरावेत.  अर्ज भरताना काही अडचणी असतील तर शिक्षकांनी शैक्षणिक विडियो ची मदत घ्यावी. 

✴️ जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सन. 2022-23 चे सुधारित वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👇 

✴️ जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया विषय संवर्ग भाग एक व भाग दोन अर्ज कसा कसा करावा. याबाबत सविस्तर व्हिडिओ पहा. 👇 


✴️ Phase-3 जिल्हांतर्गत बदली -

मा.अवर सचिव,ग्रामविकास यांच्या दि.18.11.2022 च्या सुधारित वेळापत्रकानुसार Phase-3 जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही एकूण 28 टप्प्यांमध्ये राबविली जाणार आहे.

सध्या सुरू असलेले टप्पे-

📌 टप्पा क्र.1-रिक्त पदांची यादी अद्ययावत करणे-

●जबाबदार यंत्रणा-मुख्य कार्यकारी अधिकारी.

●कालावधी-दि.18.11.2022 ते 18.11.2022.

📌 टप्पा क्र.2-विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 चे फॉर्म भरणे.

●जबाबदार यंत्रणा-शिक्षक.

● कालावधी-दि.18.11.2022 ते 21.11.2022

या टप्प्यात विशेष संवर्ग 1 व 2 च्या शिक्षकांनी आपापली सेवाविषयक माहिती व बदली पाहिजे किंवा नको एव्हढीच माहिती म्हणजेच बदलीसाठी होकार किंवा नकार भरायचा आहे.प्रशासनाकडून अर्जाची पडताळणी झाल्यानंतर व आपला अर्ज पात्र ठरल्यानंतर 30 शाळांचे प्राधान्यक्रम विशेष संवर्ग 1 साठी सुधारित वेळापत्रकाच्या 10 व्या टप्प्यात आणि विशेष संवर्ग 2 साठी 13 व्या टप्प्यात भरावयाचे आहेत.

फॉर्म कोणी भरावे..?

■■ विशेष संवर्ग भाग-1 ■■

● जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या बदलीपात्र शिक्षकांच्या यादीतील विशेष संवर्ग-1 च्या ज्या शिक्षकांना बदली हवी आहे, त्यांनी बदलीसाठी होकाराचा फॉर्म भरावा.ज्यांना बदली नको आहे, त्यांनी बदलीतून सूट मिळण्यासाठी नकाराचा फॉर्म भरावा.

● जे शिक्षक वरील बदलीपात्र यादीत नाहीत,परंतु दिनांक 07.04.2021 च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 1.8.1 ते 1.8.20 नुसार विशेष संवर्ग 1 साठी पात्र आहेत,त्यांना बदली हवी असेल तर त्यांनी होकाराचा फॉर्म भरावा.

● संवर्ग 1 साठी सेवेची अट नाही,मात्र एकदा संवर्ग 1 मधून बदली झाल्यानंतर त्यांना पुन्हा 3 वर्षे विनंती बदली मागता येणार नाही.(G.R. मुद्दा क्र.4.2.7)

📢 विशेष संवर्ग भाग-1 साठी महत्वाच्या बाबी-

1. विशेष संवर्ग 1 शिक्षकांना बदलीसाठी दोनच मार्ग उपलब्ध असतील.

●एक-बदलीतून सूट मागणे (नकार देणे)

● दोन-बदलीपात्र शिक्षकांना खो देणे.

●संवर्ग 1 मधील शिक्षकांना निव्वळ रिक्त पदांवर (Clear Vacancy) बदली मागता येणार नाही. (G.R. मुद्दा क्र.4.2.6) ही तरतूद बदली अभ्यास गटाने विशिष्ट हेतू समोर ठेवून केली आहे.

● विशेष संवर्ग 1 मधील शिक्षकांनी मिळालेल्या अधिकाराचा वापर करताना योग्य ती काळजी घ्यावी. बदलीतून सूट घेणे म्हणजेच बदलीसाठी नकार देणे हा सुद्धा विशेष संवर्ग 1 अंतर्गत घेतलेला "लाभच" आहे याची जाणीव ठेवावी.

● बदलीसाठी नकार देणारा बदलीपात्र विशेष संवर्ग 1 मधील शिक्षक हा जोपर्यंत त्याची बदली होणार नाही, तोपर्यंत दरवर्षी बदलीपात्रच राहणार आहे. अशा शिक्षकांना दरवर्षी बदली प्रक्रियेत भाग घ्यावा लागणार आहे.

2. विशेष संवर्ग भाग 1 मधून फॉर्म भरणाऱ्या 1.8.1 ते 1.8.20 मधील शिक्षकांना आपापल्या संवर्गानुसार सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे. सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेईल. (G.R. मुद्दा क्.4.2.8)

पडताळणीमध्ये अर्ज अपात्र ठरला तर संबंधित शिक्षकांचा अर्ज CEO लॉगिन वरून रद्द केला जाईल व चुकीची माहिती भरल्याबद्दल एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात येईल. (शासन निर्णय दि. 28.06.2018 व उपसचिव ग्रामविकास यांचे पत्र दि.11.08.2022)

3. विशेष संवर्ग 1 मधून बदली झालेल्या शिक्षकांबद्दल बदलीनंतर तक्रार प्राप्त झाल्यास,त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून करण्यात येईल. अशी पडताळणी केल्यानंतर शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतली आहे, अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करून त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी प्रस्तावित करतील. (G.R. मुद्दा क्र.5.10.4 व 5.10.5)

4. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या लाभांचा इतरांनी जाणीवपूर्वक फायदा घेतल्यास, त्यांच्यावर RPWD Act 1995 व RPWD Act 2016 मधील तरतुदींनुसार कारवाई होऊ शकते.

■■ विशेष संवर्ग भाग-2 ■■

●पती-पत्नी यांच्या सध्याच्या कार्यरत कार्यालयांमध्ये 30 कि.मी. पेक्षा जास्त अंतर असेल तर दोघांपैकी ज्यांना बदली हवी आहे, ते विशेष संवर्ग 2 मध्ये फॉर्म भरू शकतात.शासन निर्णयातील मुद्दा क्र.1.9.1 ते 1.9.6 नुसार प्राधान्यक्रमाने संवर्ग 2 मधील शिक्षकांच्या बदल्या होतील.

●संवर्ग 2 साठी सेवेची कोणतीही अट नाही,मात्र एकदा विशेष संवर्ग 2 मधून बदली झाल्यानंतर पुन्हा 3 वर्षे विनंती बदली मागता येणार नाही. (G.R. मुद्दा क्र.4.3.6)

📢 विशेष संवर्ग भाग-2 साठी महत्त्वाच्या बाबी-

1. विशेष संवर्ग 2 मधील शिक्षकांना जोडीदाराच्या कार्यालयाच्या 30 कि.मी. परिघातील सर्व उपलब्ध जागांपैकी 30 पर्याय निवडला येतील.

2. 30 कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात जवळच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात येईल.30 कि.मी.अंतराचा दाखला हा "कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/ कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग" या सक्षम अधिकाऱ्यांचाच ग्राह्य धरला जाईल.(G.R.मुद्दा क्र.4.3.5)

     इतर कोणताही अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही.

3.अर्ज पडताळणीमध्ये चुकीची माहिती भरल्याचे आढळल्यास त्यांचा अर्ज CEO लॉगिनवरून रद्द करण्यात येईल आणि त्यांच्यावर शासन निर्णय दि .28.06.2018 व उपसचिव, ग्रामविकास यांच्या दि.11.08.2022 च्या पत्रानुसार कारवाई होईल.

4.बदलीनंतर तक्रार प्राप्त झाल्यास व खोटी माहिती भरून बदली झाल्याचे आढळल्यास G.R.मुद्दा क्र.5.10.4 व 5.10.5 मधील तरतुदींनुसार निलंबनाची कारवाई होऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करतील.

🙏 बदली पोर्टल व मदत केंद्र - बार्शी .

( माहिती संकलन - Whats App समूह  - माहितीस्तव )

Post a Comment

0 Comments