स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana
या आठवड्यात परत येत आहे
स्वाध्याय उपक्रम येत्या शनिवार पासून म्हणजेच दिनांक १७ जुलै २०२१ पासून इयत्ता २ री ते १०वी साठी राज्यभरात सुरू होत आहे.
सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) ज्याप्रमाणे मागील इयत्तेचे महत्त्वाचे घटक / Learning Outcomes यावर आधारित आहे त्याप्रमाणेच या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ४ आठवडे स्वाध्याय मध्ये मूलभूत वाचन व संख्या ज्ञानावर (FLN) प्रश्न तसेच मागील इयत्तेच्या महत्वाच्या Learning Outcomes वर आधारित प्रश्न असणार आहेत.
🔻विषय - भाषा (मराठी/उर्दू) व गणित
या वेळेस स्वाध्याय चे नंबर व लिंक हे प्रत्येक विभागासाठी वेगळे असणार आहे आपल्या जिल्ह्यासाठी असलेला क्रमांक व लिंक द्वारे आपण स्वाध्याय वर नोंदणी सुरू करू शकाल.
आपल्या जिल्ह्याची योग्य लिंक व क्रमांक इथे मिळतील:👇
🔻 स्वाध्याय साठी नोंद करण्याची पद्धत -
अतिशय साधी व सरळ पद्धत आहे.
सर्वात आधी सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या स्वाध्याय क्रमांकाची व लिंक ची आपल्या फोन मध्ये नोंद करून घ्यावी.
आपल्या स्वाध्याय क्रमांकावर WhatsApp द्वारे “नमस्ते” किंवा “hello” असा मेसेज पाठवला की त्याची सुरुवात होईल.
१. नवीन विद्यार्थ्यांसाठी: - वरील प्रक्रिया केल्यावर स्वाध्यायची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल जसे की आपले नाव, इयत्ता, माध्यम व शाळेचा UDISE क्रमांक (स्कूल कोड). ही सगळी माहिती अचूक भरा. ते झाल्यास आपण स्वाध्याय सुरू करण्यास तयार आहात.
२. पूर्वी स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थ्यांसाठी: - वरील प्रक्रिया केल्यावर आपल्याला आपली सध्याची इयत्ता व शाळा विचारली जाईल. शैक्षणिक वर्ष बदलल्या मुळे आपली बदललेली इयत्ता नमूद करावी व शाळा बदललेली असल्यास नवीन शाळेचा योग्य UDISE क्रमांक (स्कूल कोड) नमूद करावा.
जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी व शिक्षक यांनी प्रयत्न करावेत.
दिनकर टेमकर
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
0 Comments