स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana
स्वाध्याय उपक्रम शनिवार, दिनांक १७ जुलै २०२१ पासून इयत्ता २ री ते १०वी साठी राज्यभरात सुरू झालेला आहे.
सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) ज्याप्रमाणे मागील इयत्तेचे महत्त्वाचे घटक / Learning Outcomes यावर आधारित आहे त्याप्रमाणेच या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ४ आठवडे स्वाध्याय मध्ये मूलभूत वाचन व संख्या ज्ञानावर (FLN) प्रश्न तसेच मागील इयत्तेच्या महत्वाच्या Learning Outcomes वर आधारित प्रश्न असणार आहेत.
स्वाध्याय उपक्रमात दिनांक 17 जुलै ते 23 जुलै 2021 या कालावधीत पहिली चाचणी ( आठवडा 1) घेण्यात आली. इयत्ता 2 री ते 10 वी साठी भाषा ( मराठी , उर्दू ) या विषयावर 15 गुणांची स्वाध्याय चाचणी घेण्यात आली. या चाचणीत मागील इयत्तेच्या Learning Outcomes वर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
पहिल्या आठवड्यातील स्वाध्याय चाचणी ज्या विद्यार्थ्यांना सोडविता आली नसेल, सोडविण्याची राहून गेली असेल तसेच इतर विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी Pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दुसऱ्या आठवड्याची स्वाध्याय चाचणी दिनांक 24 जुलै ते 30 जुलै या कालावधीत ( विषय - गणित ) सुरू असून सर्व विद्यार्थ्यांनी ही स्वाध्याय चाचणी सोडवून पूर्ण करावी.
🔻 ज्या इयत्तेची चाचणी हवी असेल त्या इयत्तेवर क्लिक करा.
• सौजन्य : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र राज्य, पुणे
0 Comments