Thank A Teacher अभियानांतर्गत 2 ते 7 सप्टेंबर 2021 दरम्यान शिक्षक कार्य गौरव सप्ताह साजरा करणेबाबत.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये शिक्षकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. विद्यार्थी शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्या शिक्षकांविषयीच्या भावना विविध उपक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात.
दिनांक 02 सप्टेंबर ते 07 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये Thank A Teacher अभियानाअंतर्गत शालेय स्तरावर विद्यार्थ्यांकडून निबंध लेखन, काव्यवाचन, काव्यलेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमाचे ऑनलाईन आयोजन करून विद्यार्थ्यांनी आपण सहभाग घेतलेल्या उपक्रमांच्या फोटोज किंवा व्हिडिओज फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारख्या समाज माध्यमांमधून
#ThankATeacher, #ThankyouTeacher, #MyFavouriteTeacher, #MyTeacherMyHero, #ThankATeacher2021
या हॅशटॅगचा वापर करून आपल्या पालकांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करावेत आणि त्याची लिंक व माहितीची नोंदणी SCERT, महाराष्ट्रच्या खालील लिंक वर करावी.
अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनास्तव
हा व्हिडीओ पहावा. 👇
पोस्ट करून झाल्यावर खालील लिंक वर आपली नोंदणी करावी. 👇
https://scertmaha.ac.in/thankateacher/register.aspx
आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीजास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्यासाठी प्रयत्न करावा.
(एम.डी.सिंह)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे

2 Comments
Thank a teacher साप्ताहाचे रूपांतर पंधरवड्यात करा सर
ReplyDeletePlease
Last date extended ahe ka? Scholl madhun amhala 8/9/2021 sangitale ahe. Link open nahi hot ahe
ReplyDelete