3030 एकलव्य ऑनलाईन मालिका

 

3030 एकलव्य ऑनलाईन मालिका      

3030 Ekalavya Online Series

  केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड  (CBSE) व भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) गांधीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने  एकलव्य ऑनलाईन मालिका सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने सृजनशीलता, संकल्पनात्मक आकलन, विचारांच्या पलीकडे  विचार (Out of Box thinking) विकसित करण्याच्या हेतूने कृतीवर आधारित अध्ययन, प्रकल्प, प्रतिकृती, विचारप्रवर्तक प्रश्न, स्वाध्याय तसेच स्वतः करून पहा (Do it yourself) चे व्हिडिओ या स्वरूपामध्ये एकलव्य ऑनलाईन मालिका असणार आहे. एकलव्य हा ऑनलाईन आंतरक्रियात्मक स्वरूपाचा शैक्षणिक उपक्रम इयत्ता सहावी ते  बारावीच्या विज्ञान आणि गणित विषयाचे अध्यापन करणारे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी दि.२६/०९/२०२१ पासून सुरु झाला असून दर रविवारी सायंकाळी ०४:०० ते ०५:०० या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. विज्ञान आणि गणित विषयातील संकल्पनावर आधारित एकलव्य ऑनलाईन मालिकेमध्ये  https://ccl.iitgn.ac.in/eklavya 

  या लिंकवर नोंदणी करून  नि:शुल्क सहभाग घेता येईल. 

शिक्षक आणि विद्यार्थी  यांना  त्यांच्या इच्छेनुसार १००रु.+कर  इतके शुल्क भरून  ऑनलाईन मालिकेचे सहभाग प्रमाणपत्र घेता येईल.

एकलव्य ऑनलाईन मालिकेच्या  ३० तासिका दिलेल्या स्वाध्यायासह  पूर्ण करणाऱ्या  शिक्षकांना  आयआयटी, गांधीनगर यांचेमार्फत शिक्षक क्षमता संवर्धन कार्यक्रम (Teacher Capacity building program) समकक्ष प्रमाणपत्र अदा करण्यात येईल.

🔻३०३० एकलव्य ऑनलाईन मालिकेचा तपशील

⏲️ वेळ -

दि. २६/०९/२०२१ पासून दर रविवारी सायंकाळी ०४:०० ते ०५:००


🔻आयोजक

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड  (CBSE) व  भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) गांधीनगर


सहभाग नि:शुल्क नोंदणी


🔻नोंदणी व प्रमाणपत्र लिंक 👇

https://ccl.iitgn.ac.in/eklavya 


🔻युट्युब चॅनेल 👇

https://youtube.com/IITGNCLI


🔻प्रमाणपत्र

सर्व मोड्यूल्स सहभाग प्रमाणपत्र (१००रु. + कर)

संपूर्ण कार्यक्रम/ शिक्षक क्षमता प्रमाणपत्र

(Certificate of Competency for whole course) (१०० रु. + कर)


३०३० एकलव्य ऑनलाईन मालिकेबाबत अधिक माहितीसाठी eklavya@iitgn.ac.in या ईमेलवर किंवा 079-23952240 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. या ऑनलाईन मालिकेमध्ये  जास्तीत जास्त शिक्षक आणि विद्यार्थी  सहभागी  होतील  या दृष्टीने आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी.


(एम.डी.सिंह)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे - ३०

Post a Comment

0 Comments