राज्यातील शिक्षकांसाठी Google Classroom प्रशिक्षण
प्रशिक्षण नावनोंदणी करण्यास 30/11/2021 पर्यंत मुदतवाढ ...
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या Google Classroom Training साठी शिक्षक नावनोंदणीची मुदत दिनांक ३०/११/२०२१ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तरी राज्यातील सर्व शिक्षकांनी याचा लाभ घेवून आपली नावनोंदणी करावी.
📲 प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध माध्यमांचा वापर केला गेला . यानुसार प्रथम टप्प्यामध्ये राज्यातील एकूण ४०,००० शिक्षकांना ऑनलाईन स्वरूपामध्ये गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्यात आले आहे . सद्यस्थितीमध्ये ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी च्या व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी च्या शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत . तरी दैनंदिन अध्यापनामध्ये विविध डिजिटल टूल्सचा यशस्वी व प्रभावी वापर शिक्षकांना करता येणे गरजेचे आहे . विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देणे , विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाचा , गृहपाठाचा , सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र पुणे व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे " Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom ” या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन माहे डिसेंबर २०२१ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे . सदरच्या वेबिनारमध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गुगल टूल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे . तसेच याप्रशिक्षण वेबिनारकरिता उपस्थित राहणेसाठी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याने प्रथमतः सर्व शिक्षकांनी https://maa.ac.in/googleclassroomtraining
या लिंकवर नाव नोंदणी करावी . या प्रशिक्षणांतर्गत सर्व शिक्षकांना मोफत G - suit आय . डी . तयार करून दिला जाणार असल्याने नोंदणी असलेल्या शिक्षकालाच सदरचा G - suit आय . डी . प्राप्त होईल , याची नोंद घ्यावी . सदर नावनोंदणी ही दि . २६ नोव्हेंबर , २०२१ शुक्रवार रात्री ११ : ५५ वाजता बंद करण्यात येणार होती त्याला आता 30/11/2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी . तरी राज्यातील सर्व शिक्षकांना सदर प्रशिक्षणाचा लाभ घेता यावा यादृष्टीने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांना सदर वेबिनारसाठी वरील लिंकवर नावनोंदणी करणेसाठी सूचित करण्यात यावे . तसेच वेबिनारचे सविस्तर वेळापत्रक यथावकाश निर्गमित केले जाईल .
विकास गरड
उपसंचालक, आय. टी.
रा. शै. सं. व प्र. प, महाराष्ट्र पुणेे
0 Comments