वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणेबाबत

 


वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणेस मुदतवाढ 

दिनांक - 5 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

👉 प्रशिक्षण नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणेबाबत ... 

संदर्भ : - १ ) शासन निर्णय क्र . चवेआ १०८ ९ / १११ / माशि -२ , दि .२.० ९ .१ ९ ८ ९ . २ ) शासन निर्णय क्र . शिप्रधो २०१ ९ / प्र.क्र . ४३ प्रशिक्षण दि .२०.७.२०२१ . 

उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद क्र .२ नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे . नदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे . नदरील पोर्टलवर प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक / मुख्याध्यापक / प्राध्यापक / प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे .

 यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे

 १. प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या

 https://training.scert.maha.ac.in

 या संकेत स्थळास भेट द्यावी .

 २. दि . ३१ डिसेंबर २०२१ रोजी १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील . 

३. दि . ३१ डिसेंबर २०२१ २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील . 

४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २३ नोव्हेंबर , २०२१ ते २३ डिसेंबर , २०२१ पर्यंत सुरू राहील . ( दिनांक - 5 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. )

  ५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे . याबाबत नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधितांना ई - मेलद्वारे देण्यात येतील .

 ६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत- गट क्र . १ प्राथमिक गट , गट क्र . २ माध्यमिक गट , गट क्र . ३ उच्च माध्यमिक गट , गट क्र . ४ अध्यापक विद्यालय गट .

 ७. प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID. शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी . 

८. नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा . 

९ . प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई - मेल आय . डी . असणे आवश्यक आहे . सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई - मेल आय . डी . वर पाठविण्यात येतील .

  १०. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी . आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास " माहितीत बदल करा " या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल . 

११ प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय https://raining.scertmaha.ac.in

 या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत . तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील .

 १२. या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक , प्रादेशिक विद्या प्राधिकरण , मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील . 

१३. प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील इंटरनेट बैंकिंग / क्रेडीट / डेबिट कार्ड / UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा . उदा . युझर आयडी , पासवर्ड इ . 

१४. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु .२,००० / - ( अक्षरी रुपये दोन हजार मात्र ) शुल्क ऑनलाईन पद्धतीने ( Credit & Debit Card , Internet Barking , UPI Payment अदा करणे आवश्यक आहे . प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन अदा करावे , एकदा जमा केलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही कारणात्सव परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी , यासंदर्भात परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये .

 १५. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल वरून trainingsupport@maa.ac.in या ई मेल आयडीवर संपर्क करावा . 

१६. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे . केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत . त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे .

 १७. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल . शासन निर्णयाचील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल . 


 ( एम . डी . सिंह ) 

संचालक 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे 

💢 शासन परिपत्रक - 👇

 
मुदतवाढ बाबतचे शासन पत्रक - 👇 

Post a Comment

0 Comments