'जिजाऊ ते सावित्री - सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा' अभियान
राज्यातील सर्व शाळांमध्ये दि. ३ ते १२ जानेवारी २०२२ या कालावधी दरम्यान " जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा " अभियान राबविणेबाबत
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ०३ जानेवारी रोजी साजरी करण्यात येते . तसेच त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षणदिन म्हणून साजरा करण्यात येतो .
शिवरायांना शुर , पराक्रमी , धाडसी योध्दा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग समाजासमोर सुजाण पालकत्वाचे आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत .
आजची स्त्री ज्ञान तेजाने तळपत आहे . जिजाऊ आणि सावित्री या महान स्त्रियांच्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्वान आदर्श घेऊन आजच्या मुलींनी आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास सक्षम स्वावलंबी आणि धाडसी समाज निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल . त्यामुळे अगदी शालेय सतरापासून विद्यार्थिनींना राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आणि कार्याची समग्र ओळख होणे आवश्यक आहे . हा केवळ विचार नाही तर जिजाऊ ते सावित्री हा ' स्त्री सन्मान मार्ग आहे .
यशस्वी जीवनासाठी आवश्यक मूल्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे या उद्देशाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांसाठी दि . ०३ ते १२ जानेवारी २०२२ या कालावधीत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे . राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत . यामध्ये शाळा , विद्यार्थी , पालक , लोकप्रतिनिधी , विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा . सदर अभियानाच्या कालावधीमध्ये शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा विविध उपक्रम राबविण्यात यावेत.
💢 या अनुषंगाने शालेय स्तरावर दि . ०३ ते १२ जानेवारी २०२२ या कालावधीत खालील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. 👇
0 Comments