24 जानेवारी पासून इ. 1 ली ते 12 वी शाळा सुरू School Reopens

 

इ. 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा 24 जानेवारी पासून सुरू करणे बाबत ...

शाळा सुरू करण्याचा अधिकार स्थानिक प्राधिकाऱ्यांना. 

In the academic year 2021-22. Regarding empowerment of local authorities to start schools from 1st to 12th standard. 

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन  राज्यातील सर्वच शाळा दि . १५ फेब्रुवारी , २०२२ पर्यंत बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. तथापि , कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने व राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा भागातून शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने राज्यातील इ .१ ली ते १२ वी च्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करुन दि . २४ जानेवारी २०२२ पासून शाळा पुन्हा सुरु करण्याचे अधिकार महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद यांना शाळा सुरु करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत . 

🔻शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण ( दोन्ही मात्रा ) झालेले असावे . 

 🔻शाळेतील १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संबंधित शाळेत करणेबाबत सर्व शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधून नियोजन करावे . 

🔻 दि . २४ जानेवारी , २०२२ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी , गटशिक्षणाधिकारी , विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे व भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा . विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा . 

🔻 शाळा सुरु करण्यासाठी शासनाने वेळोवेळी संदर्भाधीन परिपत्रकांन्वये दिलेल्या मागदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे . तसेच सदर मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार कोविड -१ ९ संदर्भात संबंधित शाळांनी मार्गदर्शक सूचना निश्चित कराव्यात . .

🔻 सुलभ संदर्भासाठी यापूर्वी दि . २९ नोव्हेंबर , २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्या आहेत.

💢 शासन परिपत्रक - 👇👇 

Post a Comment

0 Comments