स्वाध्याय उपक्रम आता वेब पेजवर व ॲप वर

 

स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana

 स्वाध्याय उपक्रम आता वेब पेजवर व ॲप वर 

कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांची शिक्षण हे विविध डिजिटल माध्यम व उपक्रमांच्या माध्यमातून सुरू आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांची शिक्षण सुरू राहावे यासाठी विविध उपक्रम सुरू केलेले आहेत त्यातीलच साप्ताहिक स्वाध्याय प्रश्नमंजुषा हा इयत्ता नववी पहिली ते नववी साठी सुरू केलेला उपक्रम खूपच स्तुत्य व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा आहे. 

स्वाध्याय उपक्रम यापूर्वी व्हाट्सॲप च्या माध्यमातून विद्यार्थी सोडवत होते परंतु आता 15 जानेवारी 2022 पासून या साप्ताहिक स्वाध्याय प्रश्नमंजुषा उपक्रमात  बदल करण्यात आला आहे. आता स्वाध्याय प्रश्नमंजुषा व्हाट्सअप वर उपलब्ध होणार नाही यासाठी नवीन वेब पेज व ॲप तयार करण्यात आले आहे. अतिशय सोप्या पद्धतीने व मनोरंजन पद्धतीने वेब पेज तयार करण्यात आले असून विद्यार्थ्यांना स्वाध्याय प्रश्नमंजुषा सोडवणे आनंददायी होणार आहे.

🔻 यापुढे स्वाध्याय प्रश्नमंजुषा वेब पेज वर सोडविण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.

👉 सर्व प्रथम खालील लिंक वर क्लिक करा.

https://web.convegenius.ai/bots?userId=1JH2ZY&botId=MH

👉 ओपन झालेल्या पेजवर तुमचा मोबाईल नंबर टाका. ( ज्या मोबाईल नंबर ने तुम्ही व्हाट्सअप वर स्वाध्याय रजिस्ट्रेशन केलेले असेल तोच मोबाईल नंबर टाका. ) व SEND OTP वर क्लिक करा.

👉 तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो खालील बॉक्समध्ये टाका. व Confirm वर क्लिक करा. 

👉 त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप वर रजिस्टर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा स्वाध्याय सोडविता येईल.

👉 वेब पेज वर स्वाध्याय सोडविताना प्रश्नाचा उत्तराचा पर्याय क्रमांक नोंदविण्याची आवश्यकता नाही फक्त योग्य पर्यायावर क्लिक करून सेंड करा.


♦️ स्वाध्याय उपक्रमात सहभागी होण्यासाठी तसेच या आठवड्याची स्वाध्याय चाचणी/ प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी 👇


👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Post a Comment

0 Comments