क्रांतिकारी युगपुरुष श्री संत सेवालाल महाराज जयंती
Sant Sevalal Maharaj Jayanti
१५ फेब्रुवारी
संत सेवालाल महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!! 💐🙏
📲 संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
🔻पूर्ण नाव - सेवा भीमासिंह रामावत
🔻जन्म - १५ फेब्रुवारी १७३९,
🔻मृत्यू - ४ डिसेंबर १८०६
रुईगड, जिल्हा - यवतमाळ, महाराष्ट्र
🔻वडील - भीमासिंह नायक
🔻आई - धरमणीमाता
✴️ क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज हे शूरवीर बंजारा समाजाचे सतगुरु होते. क्रांतिसिंह सेवादास महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते.
✴️ संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता , पर्यावरण रक्षण,गोरक्षाचा संदेश दिला. महाराष्ट्र व तेलंगाना राज्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूद्ध लढा सुद्धा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रही भूमिका घेतली.
✴️ क्रांतिकारी युगपुरुष संत सेवालाल महाराज -
बंजारा समाजातील समाज सुधारक संत सेवालाल यांची आज जयंती. त्यांनी समाजाला क्रांतिकारी विचारांचे दिलेले बोल वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात. संत सेवालाल यांनी दिलेल्या सेवाभावाची शिकवण बंजारा समाजाने आपल्या कंठात गीतांच्या रूपाने जपून ठेवली. गोरबंजारा जमातीमध्ये संत सेवालाल महाराज हे माेठे संत हाेऊन गेले. संत सेवालाल महाराजांचा जन्म माघ कृष्ण पक्ष साेमवार, दि. १५ फेब्रुवारी १७३९ राेजी बंजारा कुटुंबामध्ये गुलाल डाेडी तांडा, ता. गुत्ती, जि. आनंदपूर (आंध्रप्रदेश) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक व आईचे नाव धरमणी हाेते. बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय बैलांच्या पाठीवर धान्याची गाेणी वाहण्याचा हाेता. भीमा नाईकांना चार पुत्र हाेते. सेवालाल (सेवाभाया), बद्दू, हप्पा, भाणा यांच्यापैकी सेवालाल ज्येष्ठ हाेते. सुरुवातीपासून ते विरक्त स्वभावाचे हाेते. त्या काळी बंजारा समाज निरक्षर हाेता. त्या समाजात आजही निरक्षरतेचे प्रमाण माेठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सेवालाल महाराजांनी आजन्म अविवाहित राहून समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले. माल वाहतुकीसाठी जगभर बंजारा समाज भटकत हाेता. जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात आणल्या. याचबराेबर भारतीय संस्कृतीचे दर्शन जगभर घडविले. आजही बंजारा समाजात एक भाषा व एक पेहराव टिकून आहे.
✴️ संत सेवालाल महाराजांनी समाजातील कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दारूबंदी करून स्त्रियांना अधिकार दिले. बंजारा समाज निरक्षर असल्याने महाराजांनी लाेकगीत, भजन लडीच्या माध्यमातून प्रबाेधन केले. त्या काळी समाजाला भजनाची आवड हाेती. हे ओळखून त्यांनी बंजारा बाेलीभाषेत लडी, भजन रचना करून समाजात धार्मिक व सांस्कृतिक बदल घडवून आणले. संत सेवालाल हे त्यागी, दूरदर्शिता, बुद्धिप्रामाण्य विचारांचे महान संत व थाेर समाजसुधारक हाेते. संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी बाेल मानवाला वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात. या समाजाने बंजारा समाजाचा इतिहास व सेवाभावी शिकवण आपल्या कंठात सुरक्षित ठेवली आहे.
✴️ शिका छ । शिकवा छ ।। शिकण राज घडावा छ ।।
अशी शिकवण संत सेवालाल महाराज यांनी दिली. आंध्र प्रदेशातून ते महाराष्ट्रात आले. त्यानंतर संपूर्ण भारतभर भ्रमण केले. दिल्ली येथे त्यांच्या नेतृत्वाखाली एक माेठी पंचायत भरविण्यात आली हाेती. या पंचायतीत बंजारा समाजासह इतर समाज माेठ्या संख्येने उपस्थित हाेता. बंजारा समाज त्या काळी अनेक धर्मात विभागला हाेता. ते त्यांनी राेखले. संत सेवाभायांनी आयुष्यभर तुळजाभवानी मातेची पूजा केली. याचबराेबर हिंदू धर्माची शिकवण दिली. त्यांनी पाैष शुक्ल पक्ष मंगळवार, दि. ४ डिसेंबर १८०६ राेजी रुईगड, ता. डिग्रस, जि. यवतमाळ येथे समाधी घेतली. अशा या महान विचारवादी संताचे कार्य जगासमाेर लिखित स्वरूपात उपलब्ध नाही. गाेर बाेली फक्त भाषा असल्याने त्यांची नाेंद नाही. आजमितीस भारतातील कराेडाे लाेक त्यांची पूजा करतात. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना काेटी काेटी विनम्र अभिवादन !!!
✴️ सेवालाल महाराजांचे वचन -
🔸कोई केनी भजो पूजो मत। -
भावार्थ: कोनाची पुजा आर्जा करू नक। देव मंदीरात नाही माणसात आहे।
🔸कसाईन गावढी मत वेचो। -
भावार्थः खाटीक ला गाय विकू नका। पशू प्राण्यावर प्रेम करा।
🔸चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो।
भावार्थः चोरी करून खोट बोलून पैसा कमाऊ नका किंवा तशा पैसा घरात आणू नका।
🔸केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो।
भावार्थः कोनाची निंदा चाडी चूगली लावा लावी करू नका.
🔸जाणंजो छाणंजो पछच माणजो।
भावार्थः जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा.
🔸ये जो वातेर पत रकाडीय वोन पाने आड पान तारलीयुंव |
भावार्थः ह्या गोष्टीचा जो कोनी आदर करेल, आचरणात आणेल स्वीकार करेल मी त्याचा रक्षण करेल. पाना आड पान मी त्याला तारेल।
1 Comments
Good
ReplyDelete