YCMOU B.ED. 2022-2024 प्रवेश प्रक्रिया


 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

B. Ed. Admission Process 2022-2024 

✴️बी.एड. 2022/24 साठी प्रवेशाची आणखी एक अंतिम संधी 
👉 पहिल्या फेरीत रिक्त राहिलेल्या जागांसाठी राऊंड 2 Document Verification Round 2  सुरु होत आहे.
👉 यादीत नाव असणाऱ्या बांधवांनी 12 जुलै 2022 वार मंगळवार रोजी आपापल्या विभागीय कार्यालयात उपस्थित राहावे. 
👉 सूचना पत्र व मार्गदर्शक सूचना 👇👇 


✴️सेवांतर्गत बी . एड . शिक्षणक्रम 2022-24 प्रवेश वेळापत्रक यशवंतराव चव्हाण मराहाष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2022-24 या तुकडीसाठी सेवांतर्गत बी.एड् . शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश दि . 05 मे 2022 पासून सुरू होत आहेत.
✴️ ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - 
🔻 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध दिनांक - दि. 5 मे 2022
🔻ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक - 25 मे 2022
 🔻अर्जाचे स्वयं संपादन करण्याची मुदत - दि . 25 मे 2022 - दि . 27 ते 31 मे 2022
🔻 ऑनलाईन प्रवेशासाठी व इतर माहिती आणि वेळापत्रकासाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac

 व

या संकेतस्थळांना भेट द्यावी.

✴️ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेद्वारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी Register बटन क्लिक करून नोंदणी करावी.

✴️ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.
ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता.



✴️ सेवांतर्गत बी. एड. साठी पात्रता - 
👉 शिक्षणक्रम प्रवेश पात्रता : 
🔻 यू.जी.सी. मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी / पदव्युत्तर पदवी.
🔻 पदवी / पदव्युत्तर पदवी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान ५० % ( ४ ९ .५ ते ५० टक्क्यांपर्यंतचे गुण ) व मागासवर्गीय उमेदवारांना किमान ४५ % ( ४४.५ ते ४५ टक्क्यांपर्यंतचे गुण ) गुण असणे अनिवार्य आहे . ( महाराष्ट्र शासनाने ज्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी ( स्केल ) लागू केली आहे अशा उमेदवारांना पदवी / पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्णतेच्या गुणांची अट नाही , मात्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . ) 
🔻डी.एड. / डी.टी.एड. क्राफ्ट टीचर डिप्लोमा हे शिक्षणक्रम पूर्ण केलेले आणि मान्यताप्राप्त प्राथमिक स्तरावर शासनाने मंजूर केलेल्या पदावर पूर्णवेळ / अर्धवेळ काम करणाऱ्या व किमान दोन वर्षांचा ( अर्धवेळ असल्यास ४ वर्षे ) अनुभव असलेल्या अध्यापकांना सेवाज्येष्ठतेनुसार प्रवेश मिळेल.
🔻प्रवेशासाठी किमान दोन वर्षांचा अनुभव अनिवार्य असेल . पूर्णवेळ / अर्धवेळ सेवेत असल्याचे व शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंत सेवेत ठेवले जाईल , असे शाळाप्रमुखांचे प्रमाणपत्र देऊ शकणाऱ्या पदवीधर शिक्षकांना या शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल .





Post a Comment

0 Comments