Udise plus 2022-23

 

Udise plus सन. 2022-23

Data Capture Format (DCF)

इंग्रजी व मराठी डाऊनलोड साठी उपलब्ध ( pdf स्वरूपात) 👇

  💥 सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती सन २०२२-२३ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत करणेबाबत मार्गदर्शक सूचना.

 👇 Udise plus भरण्यासाठी लिंक 👇

https://udiseplus.gov.in/

संदर्भ: स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र. D.O.No.२३-७/२०२२- Stats दि. ३० ऑगस्ट, २०२२.

✴️भारत सरकारकडून संदर्भिय पत्राद्वारे राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमार्फत संगणकीकृत करण्याकरिता कळविले आहे. यु-डायस प्लस प्रणालीमधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकास, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक (PGI), National Achievement Survey (NAS), School Education Qulity Index (SEQI) निर्देशांकांची प्रभावीपणे अंमलबजावणी व नियंत्रण करण्याचे नियोजित केले आहे.

✴️ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये केंद्र शासनाकडून दोन टप्प्यामध्ये माहिती संकलित करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये शाळेची सांख्यिकी माहिती (शाळेचे ठिकाण, व्यवस्थापन, माध्यम, इत्यादी) शाळा सुरक्षा, अनुदान व खर्च, व्यावसायिक प्रशिक्षण, भौतिक सुविधा, साहित्य उपक्रमे, संगणक आणि नाविन्यपूर्ण डिजीटल उपक्रम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग इत्यादि माहिती संगणकीकृत करण्यात येणार आहे. याकरिता सर्व शाळांना तालुका स्तरावरून Username व Password उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

💥 दुसऱ्या टप्प्यामध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती विद्यार्थ्यांचे वडिलांचे नाव, आईचे नाव, मोबाईल नंबर, घराचा पत्ता, वर्ग, जनरल रजिस्टर, नाव, नंबर, जन्म दिनांक, जात, BPL, दिव्यांगांचे प्रकार, शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या सुविधा, व्यावसायिक शिक्षण संबंधित माहिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती, आधार संबंधित माहिती, RTE प्रवेश, सहाय्यभूत सुविधा इ. यु-डायस प्लस सॉफ्टवेअरमध्ये शाळास्तरावरून अद्ययावत करण्यात येणार आहे.

✴️दि. १७ ऑक्टोबर, २०२२ पासून यु-डायस प्रणालीमध्ये शाळांची माहिती संगणकीकृत करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय सूचना केंद्र, शालेय शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सन २०२२-२३ चे यु-डायस प्रपत्राबाबत झालेले बद्दल याबाबत जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांना दि. २० सप्टेंबर, २०२२ रोजी आयोजित केलेल्या कार्यशाळेत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

सदरची माहिती भारत सरकार व राज्य सरकार विविध योजनांच्या अंमलबजावणासाठी करणार असल्याने सदरची माहिती अचूक असणे आवश्यक आहे. सन २०२३ - २४ समग्र शिक्षा या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक भारत सरकारला सादर करण्यात येणार आहे व याच माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून निधी मंजूर करण्यात येतो.

✴️ Udise plus सन. 2022-23 डाटा कॅपचर फॉरमॅट ( DCF) इंग्रजीत - Pdf स्वरूपात डाऊनलोड साठी येथे क्लिक करा. 👈 

✴️ Udise plus सन. 2022-23 डाटा कॅपचर फॉरमॅट ( DCF) मराठीत - Pdf स्वरूपात डाऊनलोड साठी येथे क्लिक करा. 👈


Post a Comment

0 Comments