Javahar Navodaya Vidyalaya
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा सन. 2023
आवेदन पत्र भरणे सुरू ...
Online Form भरण्यास सुरुवात...
🔻 जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी -2023
👉जवाहर नवोदय विद्यालय मध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या वर्ग 6 वी तील प्रवेशाकरिता जवाहर नवोदय विद्यालय , निवड चाचणी- 2023 ही
दि . 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता सर्व जवाहर नवोदय विद्यालयांसाठी एकाच वेळी घेण्यात येईल.
🔻 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2023 ही आहे .
🔻जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2023 साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया :
( i ) जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन द्वारे सोपी केली आहे . ऑनलाईन अर्ज नोंदणी नवोदय विद्यालय समिती च्या एडमिशन पोर्टल द्वारे www.navodaya.gov.in या संकेत स्थळावर विनामूल्य करता येईल.
( ii ) पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करतांना , योग्यरित्या भरलेले प्रमाणपत्र ज्यावर स्वत : चे अलीकडील काळात काढलेले छायाचित्र आणि स्वतःची तसेच पालकाची स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र ( jpeg स्वरूपात , 10kb - 100kb प्रमाणात ) ऑनलाईन अपलोड करावयाचे आहे . ( iii ) राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था ( N.I.O.S. ) च्या पात्र उमेदवारांनी ' बी ' प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे आणि त्यांच्या राहण्याचा तोच जिल्हा असावा ज्या जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात तो / ती प्रवेश घेऊ इच्छित आहे .
( iv ) अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया खुली , सोपी , मुक्तस्त्रोत आणि विनामूल्य आहे . डेस्कटॉप , लॅपटॉप , मोबाइल , टॅब्लेट इत्यादी कोणत्याही स्त्रोतांकडून अर्ज सबमिट केला जाऊ शकतो .
( v ) सर्व जवाहर नवोदय विद्यालय मध्ये अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया खुली , सोपी व विनामूल्य करण्यासाठी मार्गदर्शन मंच सुरु करण्यात आलेले आहेत .
उमेदवारांसाठी सूचना:
🔸ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत फक्त एकच टप्पा असतो.
🔸ओबीसी उमेदवारांना आरक्षण केंद्रीय यादीनुसार लागू केले जाईल. केंद्रीय यादीत समाविष्ट नसलेल्या OBC उमेदवारांनी सर्वसाधारण उमेदवार म्हणून अर्ज करावा.
🔸फक्त JPG फॉरमॅटमध्ये अर्ज भरणे सुरू करण्यापूर्वी खालील स्कॅन केलेल्या प्रती तयार ठेवा.
🔸उमेदवाराची स्वाक्षरी. (स्वाक्षरीचा आकार 10-100 kb दरम्यान असावा.)
🔸पालकांची सही. (स्वाक्षरीचा आकार 10-100 kb दरम्यान असावा.)
🔸उमेदवाराचे छायाचित्र. (प्रतिमेचा आकार 10-100 kb च्या दरम्यान असावा.)
🔸पालक आणि उमेदवार यांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आणि मुख्याध्यापकाद्वारे सत्यापित. (प्रतिमेचा आकार 50-300 kb च्या दरम्यान असावा.)
🔸उमेदवाराकडे आधार क्रमांक नसल्यास सक्षम सरकारी प्राधिकरणाद्वारे जारी केलेले पालकांचे रहिवासी प्रमाणपत्र
👉 जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.
👉 जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा माहितीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी👈 येथे क्लिक करा.
👉जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा फॉर्म / प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.
👉 नवोदय विद्यालय सराव परीक्षा पेपर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
0 Comments