संदिप सोनार यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास फाऊंडेशन जळगाव यांचा भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार सन. 2022-23 प्रदान करण्यात आला.
जिल्हा परिषद केंद्र शाळा टाकळी बु. येथील पदवीधर शिक्षक ( तंत्रस्नेही शिक्षक ) श्री. संदीप मधुकर सोनार यांना मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने दिला जाणारा भारतरत्न मौलाना आझाद आदर्शरत्न पुरस्कार सन 2022-23 प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रम आज दिनांक 12 मार्च 2023 रोजी अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात श्री. संदीप सोनार यांना शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, पोलीस, पर्यावरण, उद्योजक इत्यादी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले.




0 Comments