केंद्रप्रमुख कर्तव्ये व जबाबदाऱ्या - केंद्रप्रमुख भरती परीक्षा पेपर 2

 


💥 मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 

🔸 केंद्रप्रमुख भरती परीक्षा

🔸पेपर - दुसरा 

🔸 घटक - केंद्रप्रमुखांची कर्तव्य व जबाबदाऱ्या 

👉 घटकाची महत्त्वपूर्ण माहिती व घटकावर आधारित ऑनलाईन टेस्ट  ....

👉 घटकावर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

👉 घटकाची उपयुक्त pdf 👈

⬇️

🔸प्राथमिक शिक्षण हे बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज परिवर्तनासाठी व राष्ट्रीय विकासाकरिता एक महत्त्वाचे साधन आहे. सर्वोच्च न्यायालयाने उन्नीकृष्णन खटला प्रकरणी निकाल देताना असे आदेश दिले होते की, घटनेच्या कलम २१ प्रमाणे प्रत्येकाला जीवन जगण्याचा हक्क, गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण मिळाल्याशिवाय मिळणार नाही. त्यानुसार केंद्रशासनाने ८६ वी घटनादुरुस्ती करून कलम २१-ए द्वारे ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची राज्यघटनेद्वारे तरतूद केली.

महाराष्ट्रात प्राथमिक शाळांचे प्रशासकीय व शैक्षणिक सनियंत्रिण योग्य व प्रभावी होण्यासाठी ४,८६० केंद्रीय प्राथमिक शाळा निश्चित करून त्या शाळांवर केंद्र प्रमुखांची नेमणूक करण्यात आली. सन १९८६ चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी कृती कार्यक्रम हाती घेण्याचे राज्यांना सूचित करण्यात आले होते. त्यादृष्टीने महाराष्ट्रात केंद्रीय प्राथमिक शाळा व केंद्र प्रमुख पदाची निर्मिती १९९४ मध्ये करण्यात आली.

⬇️

🔸शासनाने विहित केलेल्या निकषांनुसार सर्वसाधारणपणे जिल्हा परिषदेच्या १० प्राथमिक शाळांच्या समूहासाठी १ केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करून त्या शाळांच्या नियंत्रणासाठी केंद्र प्रमुख नेमला जातो. दुर्गम आदिवासी डोंगराळ भाग लक्षात घेऊन काही ठिकाणी ८ प्राथमिक शाळांसाठी केंद्र प्रमुख नेमले जातात. ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या १० जून, २०१४ रोजीच्या अधिसूचनेनुसार केंद्र प्रमुखाची रिक्त पदे ही सरळसेवेतून परीक्षेद्वारे ४० टक्के, विभागीय परीक्षेद्वारे ३० टक्के व सेवाजेष्ठतेने ३० टक्के भरली जाणार आहेत. त्यादृष्टीने अलीकडेच ९ सप्टेंबर, २०१९ च्या शासन निर्णयाद्वारे केंद्र प्रमुख परीक्षा पेपर एक व पेपर दोनचा विस्तारित अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे.

⬇️

✴️ केंद्र प्रमुख पद निर्माण करण्याची उद्दिष्टे - 

महाराष्ट्र राज्यात १४ नोव्हेंबर, १९९४ च्या शासन निर्णयाद्वारे ४,८६० केंद्र प्रमुख पदांची निर्मिती करण्यात आली होती. प्राथमिक स्तरावरील शिक्षकांना मार्गदर्शनाचे काम करणे व प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावण्यात केंद्र प्रमुखाची भूमिका महत्त्वाची असते. केंद्र प्रमुख पदाची निर्मिती करण्याची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.

(१) केंद्रशाळा समूहातील प्राथमिक शाळांचे शैक्षणिक सनियंत्रण करणे.

(२) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे.

(३) ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांना नजिकच्या शाळेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.

(४) समूहातील प्राथमिक शाळांना मासिक व वार्षिक उद्दिष्टे ठरवून देणे.

(५) समूहातील प्राथमिक शाळांचे

 निरीक्षण व पर्यवेक्षण करणे. 

(६) प्राथमिक शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी गट संमेलन आयोजित करणे.

⬇️

(७) शासनाच्या विविध योजनांची माहिती शिक्षकांना देणे.

 (८) विद्यार्थ्यांच्या संपादणुकीचे मूल्यमापन करण्याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण देणे.

(९) ग्रामशिक्षण समित्यांना मार्गदर्शन करणे.

 (१०) शिक्षक-पालक भेटीचे आयोजन करणे.

 (११) शैक्षणिक साहित्याच्या प्रभावी वापरासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करणे.

✴️ केंद्रप्रमुखांच्या पर्यवेक्षणाचे स्वरूप - 

प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठा पर्यवेक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे. केंद्र प्रमुखांनी प्राथमिक शाळांचे पर्यवेक्षण हे अधिकारी बनून नव्हे, तर एक मार्गदर्शक मित्र म्हणून करावयाचे असते. केंद्र प्रमुखांच्या शाळेत येण्याने शिक्षकांना आनंद व उत्साह वाटायला हवा इतके केंद्र प्रमुखांचे शिक्षणविषयक योगदान चांगले असावे. केंद्र प्रमुखाच्या कामकाजाचे स्वरूप पुढीलप्रमाणे-

⬇️

(१) केंद्रशाळेच्या परिसरातील शाळांना साधारणपणे दरमहा दोन भेटी देणे.

(२) शाळेला भेट देताना केंद्र प्रमुखाने एक भेट पूर्वसूचना देऊन व एक भेट पूर्वसूचना न देता द्यावी.

(३) केंद्र प्रमुखाने वर्षाच्या प्रारंभीच्या भेटीत वार्षिक नियोजन करण्याबाबत शासनाच्या योजनांची शाळांना माहिती द्यावी.

(४) केंद्र प्रमुखांनी शिक्षकांना अभ्यासक्रम, शैक्षणिक मूल्यमापन, सहशालेय उपक्रम व क्रीडास्पर्धा घेण्याबाबत मार्गदर्शन करावे.

 (५) केंद्र प्रमुखांनी दुसरी भेट देताना अगोदर दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची कितपत कारवाई झाली आहे, याचा आढावा घ्यावा.

(६) केंद्र प्रमुखांनी केंद्रीय शाळेचे गटसंमेलने आयोजित करावीत.

 (७) केंद्र प्रमुखांनी आपल्या भेटीच्या वेळी त्याची नोंद शाळेतील रजिस्टरवर करावी.

(८) केंद्र प्रमुखांनी शाळेला भेट दिल्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासमवेत शालेय समस्यांबाबत चर्चा करावी.

(९) केंद्र प्रमुखाने ग्रामशिक्षण समितीचे सभापती, सदस्य व पालक यांच्याशी चर्चा करून प्राथमिक शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी कृती कार्यक्रम निश्चित करावा.

(१०) केंद्र प्रमुखाने शाळेला भेट दिल्यानंतर शिक्षकाचे अध्यापन, शाळेतील भौतिक सुविधा व पटनोंदणी यावर विशेष लक्ष केंद्रित करावे.

⬇️

✴️ केंद्र प्रमुखांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या

केंद्र प्रमुखांची प्रशासकीय, कार्यालयीन व शैक्षणिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत -

🔸 प्रशासकीय कर्तव्ये - 

शाळा भेटी, तपासणी व पर्यवेक्षणाबाबत 

(१) समूहातील सर्व प्राथमिक शाळा, बालवाड्या, अंगणवाड्या, महिला प्रबोधन केंद्र, ग्रामीण वाचनालये, अनौपचारिक शिक्षण केंद्रे, आश्रमशाळा, प्रौढ शिक्षण केंद्र यांना नियमित भेटी देणे.

(२) प्राथमिक शाळा भेटीमध्ये दरमहा किमान एक भेट अचानक (स्थूलमानाने) व एक भेट पूर्वनियोजित असावी. पूर्वनियोजित भेटीच्या वेळी शाळा सुरू होण्यापूर्वी उपस्थित राहून पूर्ण दिवसभराचे कामकाज पाहणे व शाळा सुटल्यावर शिक्षकांची बैठक घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे.

(३) समूहातील सर्व शिक्षक नियमितपणे शाळेत येतात याची समक्ष पडताळणी करणे.

(४) ग्रामशिक्षण समिती व शाळा व्यवस्थापन समितीच्या महिन्यातून किमान दोन बैठकींना उपस्थित राहून मार्गदर्शन करणे. (दर महिन्याच्या वेगवेगळ्या ग्रामशिक्षण समिती/शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीस उपस्थित राहणे.)

(५) ग्रामशिक्षण समिती/शाळा व्यवस्थापन समितीच्या कामकाजाची माहिती घेणे व शाळांना तत्काळ पर्यायी शिक्षकाची व्यवस्था करणे.

(६) अनियमित व कामचुकार शिक्षकांवर योग्य ती कारवाई | केली जावी, यास्तव, वरिष्ठांकडे शिफारस करणे.

⬇️

(७) कोणतीही शाळा शिक्षकांविना राहणार नाही याची दक्षता घेणे व शाळांमध्ये तत्काळ पर्यायी शिक्षकाची व्यवस्था करणे.

(८) समूहातील सर्व शाळांचे अभिलेख, दस्तऐवज, डेडस्टॉक, शैक्षणिक साधने, नोंदवह्या इत्यादी अद्ययावत व सुस्थितीत राहतील यासाठी शाळांना आवश्यक त्या सूचना देणे.

 (९) केंद्रातील सर्व शिक्षक शाळेच्या गावी राहतात याची खात्री करणे.

(१०) शाळा सुधार योजना, शैक्षणिक उठाव, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, गणवेश वाटप, मुलींचा उपस्थिती भत्ता, पुस्तकपेढी योजना, शालेय पोषण आहार योजना, वैद्यकीय तपासणी इत्यादी कार्यक्रमांचा आढावा घेऊन त्यांची व्याप्ती व उपयुक्तता वाढविण्यासाठी प्रेरक म्हणून काम करणे.

(११) दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होईल यासाठी आवश्यक ते नियोजन व त्यानुसार कार्यवाही करणे. वैद्यकीय दोष आढळलेल्या विद्यार्थ्यांवर योग्य ते उपचार होतील असे पाहणे.



Post a Comment

0 Comments