किशोर हे ८ ते १४ ह्या वयोगटातील मुलांसाठी बालभारतीच्या वतीने चालवण्यात येणारे मासिक आहे. १९७१ पासून आजवर हे मासिक प्रसिद्ध होत आहे. पुण्याचे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे मासिक प्रकाशित करते. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही ह्या मासिकाची उद्दिष्टे आहेत. किशोरवयीन शालेय विद्यार्थी ह्या वाचकवर्गासाठी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन मासिकाची मांडणी केलेली असते. मराठी किशोरवयीन मुलांमध्ये हे आवडीचे मासिक आहे.
1 Comments
Rita Dhanraj Nile
ReplyDelete