भालचंद्र नेमाडे - मराठी साहित्यिक

ओळख मराठी साहित्यिकांची 

साहित्यिक - भालचंद्र नेमाडे 

Bhalchandra Nemade  

📲 मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

🔻पूर्ण नाव - भालचंद्र वनाजी नेमाडे

🔻जन्म - २७ मे १९३८, सांगवी ता.यावल जि.जळगाव, खानदेश, महाराष्ट्र, भारत

🔻साहित्य प्रकार - कादंबरी, कविता, समीक्षा

🔻प्रसिद्ध साहित्यकृती - कोसला

🔻वडील - वनाजी

🔻पुरस्कार - साहित्य अकादमी पुरस्कार - १९९१, ज्ञानपीठ पुरस्कार- २०१५ 

✴️ भालचंद्र वनाजी नेमाडे हे परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्‍याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार आहेत. 

✴️ भालचंद्र नेमाडे हे खानदेशातून मॅट्रिक (१९५५), पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९५९), डेक्कन कॉलेजातून भाषाशास्त्र या विषयात एम.ए.(१९६१) झाले. शिवाय त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले आहे. (१९६४) नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे. 

✴️ भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून अहमदनगर (१९६५), धुळे (१९६६), औरंगाबाद. (१९६७-७१), School of Oriental and African studies, London (१९७१), आणि १९७४ पासून औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात व शेवटी ते मुंबई विद्यापीठात तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासाठी स्थापन झालेल्या गुरुदेव टागोर अध्यासनावरून निवृत्त झाले. तसेच नेमाडे यांनी गोवा विद्यापीठातही इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला.

नेमाडे ’वाचा‘ या अनियतकालिकाचे संपादक होते. 

✴️ कोसला ( १९६३) ही कादंबरी त्यांच्या वयाच्या २५ व्या वर्षी प्रकाशित झाली. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते.

✴️ कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार (१९६७), जरीला (१९७७) व झूल(१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबऱ्या लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली असून ती जुलै १५, इ.स. २०१० ला पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली. कादंबऱ्यांशिवाय त्यांचे 'देखणी' आणि 'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत. १९६० नंतरचे मराठीतील श्रेष्ठ लेखक अशी भालचंद्र नेमाडे यांची प्रतिमा आहे. 

✴️ नेमाडेंनी कादंबरी, कविता व समीक्षा ग्रंथांची निर्मिती या सर्व क्षेत्रांत साहित्यिक कामगिरी केली. रंजनवादी मूल्यांना कडाडून विरोध करतानाच परंपरेविषयी चिकित्सक असण्याकडे त्यांचा कल आहे. मराठीवरील इंग्रजी साहित्याचा प्रभाव, शैलीशास्त्रीय दृष्टीने अभ्यास ही वैशिष्ट्ये असणाऱ्याया नेमाडेंनी इंग्रजीतूनही साहित्यनिर्मिती केली. व "साहित्याची भाषा‘ हे त्यांचे भाषाविज्ञानविषयक तात्त्विक स्वरूपाचे पुस्तक वाचकांना वेगळी दृष्टी देते.

✴️भालचंद्र नेमाडे लिखित पुस्तके -

🔻कादंबऱ्या

कोसला (१९६३). अनेक भारतीय भाषांत आणि इंग्रजी भाषेतही कोसलाच्या आवृत्त्या निघाल्या,. भाषांतरे झाली.

जरीला (१९७७), हिंदीतही अनुवादित; अनुवादक - गोरख थोरात)

झूल (१९७९). हिंदीतही अनुवादित; अनुवादक - गोरख थोरात)

बिढार (१९६७)

हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ (२०११). हिंदीत - जीनेका समृद्ध कबाड (गोरख थोरात)

🔻कविता संग्रह

देखणी : मेलडी आणि नंतरच्या कविता (कोकणीतसुद्धा अनुवादित झालेला काव्यसंग्रह, अनुवादक-रमेश वेळुसकर). या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत.

मेलडी (१९७०). या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत.

🔻समीक्षा

टीकास्वयंवर

तुकाराम

मुलाखती

साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण

साहित्याची भाषा

सोळा भाषणे

🔻इंग्रजी

इंडो - ॲंग्लिकन रायटिंग्ज - टू लेक्‍चर्स

नेटिव्हिजन

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी

द इन्फ्ल्युएन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी - ए सोशिओलिंग्विस्टिक ॲन्ड स्टायलिस्टिक स्टडी 

✴️ भालचंद्र नेमाडे यांना मिळालेले पुरस्कार -

🔸’साहित्याची भाषा’साठी कुरुंदकर पुरस्कार (१९८७)

🔸’देखणी’साठी कुसुमाग्रज पुरस्कार (१९९१)

🔸’देखणी’साठी ना.धों. महानोर पुरस्कार (१९९२)

🔸कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार, (इ.स. २०१३). एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असते.

🔸’झूल’साठी कऱ्हाडचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (१९८४)

🔸साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. १९९० - टीकास्वयंवर या टीकाशास्त्रावरील पुस्तकासाठी

🔸महाराष्ट्र फाउंडेशनचा गौरव पुरस्कार (२००१)

🔸’बिढार’साठी ह.ना. आपटे पुरस्कार (१९७६)

🔸’हिंदू एक समृद्ध अडगळ’साठी ज्ञानपीठ पुरस्कार (२०१५)

✴️ भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने त्यांनी मातृभाषांवरील इंग्रजीचे वाढते प्रस्थ, मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा, हिंदुत्व, साहित्य संमेलन अशा अनेक विषयांवर आपले परखड विचार मांडले.


🙏 स्रोत - विकिपीडिया 







Post a Comment

0 Comments